Showing posts with label आपुलीच वैरी. Show all posts
Showing posts with label आपुलीच वैरी. Show all posts

Wednesday, June 3, 2020

आपुलीच प्रतिमा होते ....

काहीकाही व्यक्तीमत्वेच अशी असतात की त्यांना कुणीतरी शत्रू कायम आपल्यासमोर लागतो.
कुणी शत्रूत्व घ्यायला तयार नसेल तर ही मंडळी स्वतःच कुणाशी तरी शत्रुत्व घेतात.
आणि ते ही नाही जमले तर काल्पनिक शत्रू तयार करून ही मंडळी त्याच्याशी झगडत बसतात.
एकूण काय ? तर या मंडळींना कायम शत्रू समोर हवा असतो आणि त्यामुळेच ही मंडळी कालांतराने स्वतःच स्वतःचे शत्रू बनतात.
"आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी" सारखे.
या वृत्तीवर पुलंनी खूप गहन चिंतन करून हलक्याफुलक्या स्वरूपात आपल्यासमोर मांडलेल्या "समजा कुणी तुमच्या मुस्काटात लावली तर ?" या लेखाची आठवण न झाली तरच नवल.
- अगदीच अजातशत्रू नसला भरपूर मित्रांच्या गराड्यात रमायला कायम आवडणारा राम.



मूळ लेखाची लिंक