Saturday, August 11, 2012

कृष्णभूमीत ४ : फ़तेहपूर सीकरी



कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली


कृष्णभूमीत २ : नवी दिल्लीत






१०/०५/२०११.

आग्र्यातून निघायला दुपारचे चार वाजलेत. आमची गाडी बहुचर्चित फ़तेहपूर सीकरी कडे वळली. हे राजस्थानात आहे ही नवीन माहिती कळली. आग्रा ते फ़तेहपूर सीकरी रस्ता छान आहे. मध्ये टोल नाका आहेच. उत्तर प्रदेश सोडून राजस्थानात शिरलो आणि भूमी वेगळीच वाटायला लागली. साधारणतः ५ - ५.१५ च्या सुमारास फ़तेहपूरला पोहोचलो.



फ़तेहपूर ला असलेला हा दिशादिग्दर्शक फ़लक.




"भव्यता" . हा एकच शब्द फ़तेहपूर सीकरीच्या वर्णनाला योग्य ठरेल. अकबराच्या कल्पनेतलं भव्य दिव्य बांधकाम. हाच तो बुलंद दरवाजा.








किल्ल्याच्या आतील अप्रतीम कलाकुसर.




अकबराच्या गुरुची मजार. कौस्तुभची खास पोज.





आठवतंय का "परदेस" चित्रपटातलं "दो दिल मिल रहे है" गाणं ? तशी या ठिकाणी अनेक गाणी चित्रीत झालेली आहेत पण माझ्या ठळकपणे लक्षात राहिलेलं हेच गाणं. ह्या चित्रपटातच महिमा चौधरी लक्षात राहिली होती. (पहिलाच चित्रपट होता म्हणून असेल. पण नंतर कुठे गेली ? सध्या काय करतेय ? काहीही लक्षात नाही.)



राजस्थानात असल्या अगदी टिपीकल भारतीय बनावटीच्या काही गाड्या दिसल्या. कुठली कंपनी ? गाडी कुठे बांधली ? कशाचाच पत्ता नाही.

1 comment: