पुन्हा एकदा प्रसिद्ध कुंभमेळा सुरू झालेला आहे. यानिमित्ताने नागा साधू ,त्यांचे आखाडे , त्यांच्या मारामाऱ्या वगैरे दाखवून टी. व्ही चेनेल्स चा टी आर पी वाढतो. इतरही काही व्यवसाय कुंभमेळा ज्या शहरात भरतो, त्या शहरात भरभराटीला येतात.
पण एक सच्चा हिंदू म्हणून आपल्याला त्याबद्दल किती आस्था वाटते ? की त्या एकंदर प्रकाराची चीडच येते ? अलाहाबादचा त्रिवेणी संगम हा अत्यंत प्रदूषित झालेला आहे. दिल्ली आणि आसपासच्या नागरी वस्तीतला मैला तसेच काठावरच्या शहरांतल्या उद्योगांचे प्रदूषित पाणी यमुनेत मिसळून संगमापर्यंत येईस्तोवर त्या पाण्यात किती स्वच्छ्ता उरते ? ते एक परमेश्वरालाच ठाउक. १९९४ मध्ये एस.एस.बी. च्या मुलाखतीसाठी अलाहाबादला गेलो असताना संगमावर आंघोळ करून परत छावणीवर जाइपर्यंत अंगाला असह्य खाज सुटली होती आणि मुक्कामाच्या ठिकाणी शुद्ध पाण्याने अंघोळ केल्यानंतरच तो दाह शमला होता. मग अशा पाण्यात अंघोळीचे आणि त्यासाठी भांडण्याचे काय प्रयोजन ?
आपल्या संस्कृतीत गंगा नदीला देवत्व दिल्या गेलेले आहे. अशा देवरूप गंगेत मी केवळ माझी पापे धुवायला अंघोळ करायची ? (मग पुन्हा पापी आचरणासाठी सिद्ध.) त्या नदीला प्रदूषणाचा किती विळखा पडलाय ? त्याच्या निर्मूलनासाठी जर मी काही करत नसेल तर त्या पवित्र गंगेने मला पावन का कराव ? ज्या देशात दुष्काळामुळे माणसांना प्यायला पाणी नाही तिथे आधीच प्रदुषित झालेल्या पाण्याला आणखी प्रदुषित करून आपण आशीर्वाद घेतोय की किती मायमाऊल्यां चे शिव्याशापाचे धनी होतोय ? हा विचार आज सभ्य सुसंस्कृत आणि जगाच्या हिताचे विचार करणा-यांनी करायलाच हवा.
आता दोन वर्षांनी नाशिक ला कुंभमेळा भरेल. आजच महाराष्ट्रात पाण्यावरून रण पेटलय . भीमेच पाणी कुणाच ? यावरून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत जुंपली आहे. गोदावरीच्या थोड्याशाच पाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यात वाद विकोपाला गेलेत. मग अशा वेळेला हा कुंभमेळा एक आपली पुरातन प्रथा साजरी करण्यापलीकडे काय साध्य करणार ?
मी खरा हिंदू आहे म्हणूनच मी अखिल विश्वाचा विचार करू शकतोय. अशा वेळी मी मूर्खासारखा जुन्या , कालबाह्य आणि कालविसंगत रूढी आणि परंपरांना बदलण्याची इच्छा मनात बाळगत नसेन तर विवेकानंदांचॆ १५० वी जयंती साजरी करण हा एक निव्वळ उपचार होईल. विज्ञाननिष्ठ सावरकर केवळ आमच्या पुस्तकांमध्ये उरतील. (कधीमधी काही रिकामी टाळकी भडकवायला त्यांचा उपयोग होऊ शकेल म्हणा.)
seriously u r right sir.
ReplyDeleteVery nice sir. This is a brainstorming article.
ReplyDeleteVery true and nice article.
ReplyDeleteAkandar parishtiti laxat gheta, desh ram bharose chalala ahe mhanayla kai harkt nai.
Kumbh mela ha bhag vicharat gheta "hindu ekatmika" (hindu unity) dakhvnyacha paramparenusar chalt aleli ek pratha ahe.
Very fact
ReplyDelete