सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आमचे बस फ़ॅन मित्र श्री पियुष पाटील यांची पोस्ट वाचून मी त्यांना फ़ोन करतो.
"पियुषजी, बसचे मॉडेल खूपच छान झालेले आहे. असे किती मॉडेल्स तुम्ही बनवलेत ?"
"सर, गेल्या वर्षभरात असे चारशे मॉडेल्स मी बनवलेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्वत्र आणि विदेशातही माझे मॉडेल्स गेलेले आहेत."
"वा पियुषजी. फ़ार छान काम आहे. कीप इट अप."
आणि लगेचच दोन तीन दिवसांनी संध्याकाळी पियुषजींचा अचानक मेसेज येतो. "सर, उद्या काही कामानिमित्त सकाळी नागपूरला येतो आहे. तुमच्यासाठी एक मॉडेल घेऊन येतो आहे."
सकाळी पियुषजींची भेट होते. प्रेमाने तयार केलेले मॉडेल मी अत्यंत जपून घरी घेऊन येतो आणि घरी आल्यावर मात्र मी पुन्हा वय वर्षे सात किंवा आठचा राम किन्हीकर होतो. माझ्या बसफ़ॅनिंगला प्रोत्साहन देणा-या आणि एकेकाळी असेच सुंदर सुंदर बस मॉडेल्स बनविणा-या माझ्या वडीलांची आठवण मला येते.
बस चे मॉडेल मिळाल्यानंतर त्याच्याशी खेळताना त्यातले अधिकाधिक बारकावे लक्षात येत गेलेत आणि ही बस ज्यांनी बनवली ते माझे बसफॅन मित्र श्री पियूष पाटील यांच्या निरीक्षणाचे खूप कौतुक वाटतं गेले. त्यावर हा खास व्हिडियो.
- एक कृतज्ञ बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment