जर तुमच्याशी कुणी खोटे बोलत असेल आणि त्याचे तुम्हाला वाईट वाटत असेल,
तर;
त्या व्यक्तीने तुम्हाला त्या प्रसंगी अगदी खरे सांगितले असते तर तुमची प्रतिक्रिया / प्रतिसाद कसा झाला असता ? याचा विचार करा. त्या व्यक्तीने खरे सांगितले असते तर तुम्हाला आत्तापेक्षा कमी वाईट वाटले असते की जास्त वाईट वाटले असते ? याचा विचार करा.
म्हणजे आपल्याला नक्की वाईट का वाटतय ? याचे नीट आकलन होईल. आपल्याच व्यक्तीमत्वातल्या एका सत्याचा आपणा स्वतःला साक्षात्कार झाला हा एकप्रकारे आपला फ़ायदाच झाला म्हणायचा.
- वाईटातून सुद्धा ब-याचदा चांगले निघू शकतं यावर दृढ विश्वास असलेला, ईशावास्य वृत्तीतला विनोबाभक्त, रामोबा. अधिक श्रावण शुद्ध प्रतिपदा, १८ - ७ - २३
No comments:
Post a Comment