Friday, February 9, 2024

रंग आणि आत्मा दोन्हीही बदललेली बसगाडी. हिरकणी ची निळीपरी आणि ती ही शिवनेरी रंगात.

महाराष्ट्र एस. टी. आपल्या परिवर्तन गाड्यांना संपूर्ण लाल रंगात रंगवते. त्यांना आम्ही बसप्रेमी "लालपरी" नावाने संबोधतो.


महाराष्ट्र एस. टी. आपल्या प्रिमीयम बसगाड्यांना (व्हॉल्वो, स्कॅनिया) निळ्या रंगात रंगवते. त्यांचे अधिकृत ब्रॅंडनेम "शिवनेरी" आहे.


कोल्हापूर विभाग आपल्या काही साध्या (लालपरी) गाड्यांना शिवनेरी रंगात रंगवतो.




ही बसही तशीच. पूर्वी ही निम आराम गाडी होती. (अधिकृत ब्रॅंडनेम हिरकणी) तेव्हा ती पांढ-या रंगात हिरव्या छतासह आणि निळ्या पट्ट्यासह असणार. पण कोल्हापूर विभागाने तिचे रूपांतर साध्या बसमध्ये (अधिकृत ब्रॅंडनेम परिवर्तन) मध्ये केले आणि तिला ही शिवनेरीची रंगसंगती देऊन टाकली. मी ही बस कॅमे-यात टिपली तेव्हा या बसची मूळ निम आराम आसने तशीच ठेवलेली होती. त्या आसनांना साध्या बसच्या आसनांमध्ये परावर्तित करण्यात आलेले नव्हते.


या बसचा मार्गफ़लकही अगदी एवंगुणविशिष्ट आहे. यावर कुठेही ही बस कुठून कुठे जातेय हे लिहीलेले नाही. मार्गफ़लकावर फ़क्त "विना वाहक विनाथांबा" एव्हढेच लिहीलेले आहे. बसचा डेपो पाहून ही बस इचलकरंजीवरून कोल्हापूरकडे येतेय हा अंदाज आपण बांधायचा कारण हा फ़ोटो हातकणंगले ते कोल्हापूर रस्त्यावर ही बस असताना काढलेला आहे. 


या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे. एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर ने बांधलेल्या थोड्याफ़ार टाटा बसमधली ही एक टाटा बस. मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा प्रामुख्याने अशोक लेलॅण्डच्या चेसिसवर बसबांधणी करते. 


MH - 20 / D 9110


TATA 1510


को. इचलकरंजी डेपो


हातकणंगले - कोल्हापूर महामार्ग, दिनांक 14/10/2012


No comments:

Post a Comment