Friday, August 9, 2024

Enjoy journey more than enjoyment of reaching destination

 २६ / १२ / २०२१: चंद्रपूरला श्वशुरगृही नाताळची सुटी घालवून आम्ही कुटुंबिय नागपूरला परतत होतो. आजवर गेल्या ५० वर्षांमध्ये आम्ही नागपूर - चंद्रपूर - नागपूर हा प्रवास केलेला आहे. पण तो नेहमीच्या धोपटमार्गाने. नागपूर - बुटीबोरी - जांब - वरोडा - भांदक - चंद्रपूर असा.


आज आम्ही दुपारीच निघालो होतो. नागपूरला पोचण्याची तशी घाई नव्हती. चंद्रपूरला पाण्याच्या टाकीपाशी येईपर्यंत यावेळेस नागपूरला जाताना थोड्या वेगळ्या मार्गाने जाऊयात का ? हा विचार माझ्या आणि माझ्या सुपत्नीच्या मनात एकाचवेळी आला. चंद्रपूर - मूल - सिंदेवाही - नागभीड - भिवापूर - उमरेड हा जवळपास २०० किलोमीटर अंतराचा (जांब मार्गे हेच अंतर १५३ किलोमीटर आहे.) पण ताडोबा जंगलाच्या सीमेवरून जाणारा रमणीय रस्ता आम्ही निवडला. 

मग काय ? सुंदर जंगल रस्त्यातून सुंदर प्रवास करीत, नवा अनुभव घेत आम्ही नागपूर गाठले. 

Sometimes we need to enjoy journey towards destination more than enjoyment of reaching destination. या वाक्याचा प्रत्यय घेतला.

- एकांतात रमणारा, प्रवासात रमणारा तरी माणूसवेडा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

व्हिडीयो एडिटिंग : चि. मृण्मयी राम किन्हीकर.



No comments:

Post a Comment