वाचा : संस्कृत सुभाषिते - १
संस्कृत सुभाषिते - २
"शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषुच पण्डितः
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवती वा न वा. "
संस्कृत सुभाषिते - २
आपण मराठीत बरीच संस्कृत सुभाषिते त्यांच्या संदर्भाविना वापरतो. कधी कधी तरी मराठीत अर्थविपर्यास होत असला तरी वापरतो. त्यातलेच हे एक.
"शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषुच पण्डितः
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवती वा न वा. "
(शंभर जणांत एखादा शूर निपजतो, हजारांमध्ये एखादा विद्वान होतो, दहा हजारांत एखाद्यालाच वक्तृत्वकला वश होते पण दाता या शंभर, हजार, दहा हजारातही कुणी नसतो. दात्यांची सर्वत्र वानवाच असते.)
आपण यातलं " वक्ता दशसहस्त्रेषु" हे मोठ्या गौरवाने वापरतो. तसा हा थोडा वक्तेपणाचा गौरवही आहेच पण त्यानंतरच्या "कुणाच्याही दाता नसण्याच्या" खंतीची आपण दखल घेत नाही. आहे की नाही मजा ?
No comments:
Post a Comment