Showing posts with label Samartha Ramdas Swami. Show all posts
Showing posts with label Samartha Ramdas Swami. Show all posts

Friday, April 28, 2023

करूणाष्टक - ३८

 


ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें ।


म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे ।


सुटे ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३८ ॥


हे रामराया, आपल्या भक्तांना उद्धरून नेण्याचे तुझे वचन आहे. त्या वचनाला स्मरून तू आम्हा दीन भक्तांना आता हाती धर आणि आम्हाला हा भवसागर पार करून ने. जर तू असे केले नाहीस तर तुझे भक्त उद्धरणाचे ब्रीद तुझ्याजवळ राहणार नाही म्हणून तुझ्या ब्रीदासाठी तरी तू आमचा उद्धार कर.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )



Thursday, April 27, 2023

करूणाष्टक - ३७

 


समर्थापुढें काय मागों कळेना ।


दुराशा मनीं बैसली हे ढळेना ॥


तुटो संशयो नीरसी सर्व चिंता ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३७ ॥


मला या रामरायापुढे काय मागावे हेच कळत नाही. शाश्वत स्वरूपाचे भगवत्भक्ती, भगवत्प्रेम मागण्यापेक्षा मी अशाश्वत स्वरूपाचे या संसारतलेच मागत बसलो आहे कारण माझ्या मनात वाईट आशा ठाण मांडून बसलेली आहे. हे रामा, माझ्या मनातले तुझ्या शाश्वत स्वरूपाविषयी येणारे सर्व संशय तू निरसन कर. हे रामा, हेच माझे मागणे आता तुझ्या पायाशी आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Wednesday, April 26, 2023

करूणाष्टक - ३६

 



मनीं कामना कल्पना ते नसावी ।


कुबुद्धी कुडी वासना नीरसावीं ॥


नको संशयो तोडिं संसारव्यथा ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३६ ॥

मनात काही इच्छा, काही कल्पना असू नयेत. माझ्या मनात काही वाईट बुद्धी, काही वासना असल्यास हे भगवंता तू त्यांचे निरसन कर. माझ्या मनात आता या संसारातल्या विविध व्यथा उत्पन्न करणारे विविध संशय नको आहेत. हे रघूनायका माझे तुझ्याकडे हेच मागणे आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


करूणाष्टक - ३५

 


भवे व्यापलो प्रीतीछाया करावी ।


कृपासागरे सर्व चिंता हरावी ॥


मज संकटी सोडवावे समर्था ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३५ ॥


हे कृपासागरा, रामा, मी या भवातल्या दुःखांनी पूर्ण व्यापलो गेलो आहे. यातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी तूच आमच्यावर प्रेमाची सावली कर आणि आम्हाला या भवातल्या संकटांपासून सोडव हेच एक मागणे तुझ्याकडे आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )



Monday, April 24, 2023

करूणाष्टक - ३४

 


नको द्रव्य- दारा नको येरझारा ।


नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ॥


सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २७ ॥


हे देवा मला आता या जगातले अनित्य अशा स्वरूपाचे धन नको, या जगात मला आता पत्नी आणि मुलांचा संसार नको. माझ्या मनात माझ्या अल्प ज्ञानाविषयी अहंकार पण नको आहे. मला सगुण भक्तीच्या पंथाला आता तू लाव. आता हेच माझे मागणे, हे रामा, तुझ्याकडे आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Sunday, April 23, 2023

करूणाष्टक - ३३

 


सदा सर्वदा योग तूझा घडावा ।


तुझे कारणीं देह माझा पडावा ॥


उपेक्षूं नको गूणवंता अनंता ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २६ ॥


हे रामराया, मला नेहेमी तुझेच चिंतन असू दे आणि त्यायोगे सदैव माझ्या मनात तूच असू देत. तुझ्या कार्यासाठीच हा माझा अनित्य देह संपू दे. हे गुणसागरा आणि अनंत असलेल्या परमेश्वरा, तुझ्याकडे माझे हे एकच मागणे आहे. 


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Saturday, April 22, 2023

करूणाष्टक - ३२

 


मनी वासना भक्ती तुझी करावी ।


कृपाळूपणे राघवे पूरवावी ॥


वसावे मनी अंतरी नाम घेता ।


रघूनायका मागणे हेचि आता ॥


हे रामा, माझ्या मनात तुझी भक्ती करावी एव्हढीच वासना आता उरली आहे ती तू कृपाळू होऊन पूर्ण कर. माझ्या नामस्मरणाचा परिपाक म्हणून तू माझ्या मनात वास कर हेच माझे मागणे तुझ्याकडे आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Friday, April 21, 2023

करूणाष्टक - ३१

 


तुझे रूपडे लोचनी म्यां पहावे ।


तुझे गूण गाता मनासी राहावे ॥


उठो आवडी भक्तीपंथेचि जाता ।


रघूनायका मागणे हेचि आता ॥



हे रामराया, तुझेच रूप आता माझ्या डोळ्यांसमोर रहावे आणि मी माझ्या वाणीने तुझेच गुणगान करीत रहावे. मला आता तू भक्तीपंथाची आवड दे हेच माझे एकमेव मागणे तुझ्याकडे आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )

Thursday, April 20, 2023

करूणाष्टक - ३०

 


ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें ।


म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे ।


सुटे ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३० ॥


हे रामराया, आपल्या भक्तांना उद्धरून नेण्याचे तुझे वचन आहे. त्या वचनाला स्मरून तू आम्हा दीन भक्तांना आता हाती धर आणि आम्हाला हा भवसागर पार करून ने. जर तू असे केले नाहीस तर तुझे भक्त उद्धरणाचे ब्रीद तुझ्याजवळ राहणार नाही म्हणून तुझ्या ब्रीदासाठी तरी तू आमचा उद्धार कर.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Wednesday, April 19, 2023

करूणाष्टक - २९

 


समर्थापुढें काय मागों कळेना ।


दुराशा मनीं बैसली हे ढळेना ॥


तुटो संशयो नीरसी सर्व चिंता ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २९ ॥


मला या रामरायापुढे काय मागावे हेच कळत नाही. शाश्वत स्वरूपाचे भगवत्भक्ती, भगवत्प्रेम मागण्यापेक्षा मी अशाश्वत स्वरूपाचे या संसारतलेच मागत बसलो आहे कारण माझ्या मनात वाईट आशा ठाण मांडून बसलेली आहे. हे रामा, माझ्या मनातले तुझ्या शाश्वत स्वरूपाविषयी येणारे सर्व संशय तू निरसन कर. हे रामा, हेच माझे मागणे आता तुझ्या पायाशी आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Tuesday, April 18, 2023

करूणाष्टक - २८

 


मनीं कामना कल्पना ते नसावी ।


कुबुद्धी कुडी वासना नीरसावीं ॥


नको संशयो तोडिं संसारव्यथा ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २८ ॥


मनात काही इच्छा, काही कल्पना असू नयेत. माझ्या मनात काही वाईट बुद्धी, काही वासना असल्यास हे भगवंता तू त्यांचे निरसन कर. माझ्या मनात आता या संसारातल्या विविध व्यथा उत्पन्न करणारे विविध संशय नको आहेत. हे रघूनायका माझे तुझ्याकडे हेच मागणे आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


 (या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Monday, April 17, 2023

करूणाष्टक - २७

 




नको द्रव्य- दारा नको येरझारा ।


नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ॥


सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २७ ॥


हे देवा मला आता या जगातले अनित्य अशा स्वरूपाचे धन नको, या जगात मला आता पत्नी आणि मुलांचा संसार नको. माझ्या मनात माझ्या अल्प ज्ञानाविषयी अहंकार पण नको आहे. मला सगुण भक्तीच्या पंथाला आता तू लाव. आता हेच माझे मागणे, हे रामा, तुझ्याकडे आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Sunday, April 16, 2023

करूणाष्टक - २६

 


सदा सर्वदा योग तूझा घडावा ।


तुझे कारणीं देह माझा पडावा ॥


उपेक्षूं नको गूणवंता अनंता ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २६ ॥


हे रामराया, मला नेहेमी तुझेच चिंतन असू दे आणि त्यायोगे सदैव माझ्या मनात तूच असू देत. तुझ्या कार्यासाठीच हा माझा अनित्य देह संपू दे. हे गुणसागरा आणि अनंत असलेल्या परमेश्वरा, तुझ्याकडे माझे हे एकच मागणे आहे. 


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )

Saturday, April 15, 2023

करूणाष्टक - २५

 



उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी ।


अती आदरें सर्व सेवा करावी ॥


सदा प्रीती लागो तुझे गूण गातां ।


रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २५ ॥


या जगात साधकांनी जगाविषयी (या जगाचे अशाश्वत रूप मनात आणून) उदासीन वृत्ती मनात ठेवावी. शाश्वत स्वरूपाच्या भगवंताच्या रूपांची सेवा, अर्चना मात्र अतिशय आदराने आणि तत्परतेने करीत जावी. हे रामा, मी तुझे गुणवर्णन जसे जसे करीत जाईन तशीतशी मला तुझ्याविषयी प्रीती उत्पन्न होऊ दे, हेच आता तुझ्याकडे माझे मागणे आहे. 


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


करूणाष्टक - २४

 


नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही ।


नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं ॥


असा दीन अज्ञान मी दास तूझा ।


समर्था जनीं घेतला भार माझा ॥ २४ ॥


हे देवा मला ना भक्ती, ना ज्ञान, ना तुझ्याविषयी प्रेम आणि तूच सकल जीवांचे अंतिम विश्रांतीस्थान आहे याविषयी विश्वासही नाही. हे देवा मी असा दीन आणि अज्ञान तुझा दास आहे. पण तरीही तू माझा भार या लोकांमध्ये घेतला आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )

Thursday, April 13, 2023

करूणाष्टक - २३

 


सदा सर्वदा राम सोडूनि कामीं ।


समर्था तुझे दास आम्ही निकामी ॥


बहू स्वार्थबुद्धीनें रे कष्टवीलों ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २३ ॥


नेहेमी आम्ही शाश्वत स्वरूपाचे राम रूप सोडून कामातच कायम गुंतलेलो आहोत. आमच्या स्वार्थी वृत्तीने आम्हालाच आजवर खूप कष्ट दिलेले आहेत. हे देवा असे आम्ही अत्यंत बिनकामी आहोत. आणि म्हणून आम्ही व्यर्थ जन्माला आलेलो आहोत असे आम्हाला वाटते.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Wednesday, April 12, 2023

करूणाष्टक - २२

 


किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती ।


किती धर्मसंस्थापना अन्नशांती ॥


पस्तावलों कावलों तप्त जालॊं ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २२ ॥


देवा, आजवरच्या तुझ्या भक्तांमध्ये कितीतरी योगी, पुण्यपुरूष जन्माला येऊन गेलेले आहेत. त्यांनी धर्मस्थापनेसाठी खूप कामे केलीत, खूप अन्नदान करून पुण्य गाठीशी बांधले. त्यातले मी काहीच न केल्याने मी मनातून पस्तावलो आहे, रागावलोही आहे आणि मनातल्या मनात अनुताप पावलो आहे. देवा मी हा तुझा दास माझा जन्म व्यर्थ घालवतो आहे असे मला वाटते.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Tuesday, April 11, 2023

करूणाष्टक - २१

 

कितेकीं देह त्यागिले तूजलागीं ।


पुढे जाहले संगतीचे विभागी ॥


देहेदु:ख होतांचि वेगीं पळालों ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २१ ॥


हे देवा, तुझ्यासाठी, तुझ्या कार्यासाठी आत्त्तापर्यंत कितीतरी भक्तांनी स्वतःच्या देहाचा त्याग केलेला आहे आणि ते तुझ्या चरणाशी नेहेमीसाठी स्थान मिळवून बसलेले आहेत. पण माझ्या देहाला तुझी उपासना करता करता थोडे जरी दुःख झाले तरी मी ती उपासना थांबवून देतो आणि देहाची काळजी करीत बसतो. म्हणून देवा मला असे वाटते की मी तुझा दास जरी म्हणवून घेत असलो तरी माझा हा जन्म व्यर्थ आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


 (या श्लोकाचा व्हिडीयो इथे


Monday, April 10, 2023

करूणाष्टक - २०


 बहुसाल देवालयें हाटकाचीं |


रसाळ कळा लाघवें नाटकाचीं ॥


पुजा देखितां जाड जीवीं गळालों ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २० ॥


हे देवा, तुझी अनेक सोन्याची देवालये तुझ्या थोर थोर भक्तांनी उभारलेली आहेत. त्यात ते अनेक उत्सव साजरे करीत असतात. त्यांनी केलेली तुझी साग्रसंगीत पूजा पाहून मी आतल्या आत घाबरून गेलेलो आहे. यातले मी काहीही केलेले नसल्याने मी तुझा दास म्हणून व्यर्थ जन्माला आलो आहे असे मला वाटते आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )

Sunday, April 9, 2023

करूणाष्टक - १९


तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले ।


असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥


बहू धारणा थोर चकीत जालों ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १९ ॥


हे रामा, तुझ्याविषयी प्रेम बाळगणारे आणि तुझ्याच किर्तीचे गुणगान करून या जगात वावरणारे असंख्य तुझे दास आहेत. त्यांची तुझ्याविषयीची समज, त्यांनी तुला किती आपलेसे केलेय हे पाहून मी अगदी चकीत झालेलो आहे. यातले मी काहीच केलेले नसल्याने मी तुझा दास म्हणवतो तरी मी व्यर्थ जन्माला आलो असे मला वाटतेय.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


 (या श्लोकाचा व्हिडीयो इथे )