समर्थापुढें काय मागों कळेना ।
दुराशा मनीं बैसली हे ढळेना ॥
तुटो संशयो नीरसी सर्व चिंता ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३७ ॥
मला या रामरायापुढे काय मागावे हेच कळत नाही. शाश्वत स्वरूपाचे भगवत्भक्ती, भगवत्प्रेम मागण्यापेक्षा मी अशाश्वत स्वरूपाचे या संसारतलेच मागत बसलो आहे कारण माझ्या मनात वाईट आशा ठाण मांडून बसलेली आहे. हे रामा, माझ्या मनातले तुझ्या शाश्वत स्वरूपाविषयी येणारे सर्व संशय तू निरसन कर. हे रामा, हेच माझे मागणे आता तुझ्या पायाशी आहे.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )
No comments:
Post a Comment