Wednesday, April 5, 2023

करूणाष्टक - १४

 


उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।


सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥


घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।


रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥


(या जगातल्या अशाश्वत गोष्टींना जाणल्यामुळे) मला प्रभू श्रीरामांविषयी पूर्ण उपरती झालेली आहे. हा राम खरोखरच सकळांच्या सकळ भ्रमाला विराम देणारा आणि सकळ जीवांचे अंतिम विश्रांतिस्थान आहे. हे रामराया आता प्रत्येक क्षणी माझे मन तुझ्याच रूपाने भरून जाऊ दे आणि तू मला आपलेसे कर.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


No comments:

Post a Comment