सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥
या जगातले (तथाकथित) आपले जन हे केवळ आपल्या चांगल्या दिवसांचे, वैभवाचे, देहाचे सोबती असतात. आपल्यावर कठीण काळ आला की हे सगळे आपल्याला सोडून जातात. पण खरे सुख देणारा प्रभू रामराय हाच आपला खरा सखा, सोबती जो आपल्याला आपल्या अंतकाळी सोडवितो.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )
No comments:
Post a Comment