नको द्रव्य- दारा नको येरझारा ।
नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ॥
सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २७ ॥
हे देवा मला आता या जगातले अनित्य अशा स्वरूपाचे धन नको, या जगात मला आता पत्नी आणि मुलांचा संसार नको. माझ्या मनात माझ्या अल्प ज्ञानाविषयी अहंकार पण नको आहे. मला सगुण भक्तीच्या पंथाला आता तू लाव. आता हेच माझे मागणे, हे रामा, तुझ्याकडे आहे.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )
No comments:
Post a Comment