Sunday, April 9, 2023

करूणाष्टक - १९


तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले ।


असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥


बहू धारणा थोर चकीत जालों ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १९ ॥


हे रामा, तुझ्याविषयी प्रेम बाळगणारे आणि तुझ्याच किर्तीचे गुणगान करून या जगात वावरणारे असंख्य तुझे दास आहेत. त्यांची तुझ्याविषयीची समज, त्यांनी तुला किती आपलेसे केलेय हे पाहून मी अगदी चकीत झालेलो आहे. यातले मी काहीच केलेले नसल्याने मी तुझा दास म्हणवतो तरी मी व्यर्थ जन्माला आलो असे मला वाटतेय.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


 (या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


 

No comments:

Post a Comment