Monday, April 3, 2023

करूणाष्टक - १३


 


सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।

भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥

भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना ।

परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥ १३ ॥
जगात भगवंताचे नामस्मरण टाकून, भ्रमित मनाने आपण जर देहबुद्धीतच अडकून राहिलो, (या देहाला जाणवणा-या गोष्टीतच अडकून राहिलोत) तर आपले चित्त दुश्चित्त होईलच. कारण इंद्रियजन्य सुखांना खरे मानून जगात ज्या गोष्टींना आपण सुख म्हणत त्यांच्यापाठी धावत असतो, त्या सगळ्या गोष्टी अंतिमतः दुंखदायकच ठरतात.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर 


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )

No comments:

Post a Comment