बहू दास ते तापसी तीर्थवासी ।
गिरिकंदरी भेटी नाहीं जनासी ॥
स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलॊं ॥ १७ ॥
देवा, तुझे अनेक तप करणारे, तीर्थात वास करणारे आणि लोकांत न मिसळता द-या डोंगरात वास करणारे आहेत. माझी साधना तर त्यांच्यापुढे काहीही नाही त्यामुळे त्यांची स्थिती ऐकता मी खूप विस्मय पावलो आहे. आणि माझी साधना काहीही नसल्यामुळे मी या जगात व्यर्थ जमलो आहे असे मला वाटते आहे.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )
No comments:
Post a Comment