Thursday, April 6, 2023

करूणाष्टक - १६

 

असंख्यात ते भक्त होऊनि गेले ।


तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥


नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १६ ॥


हे रामराया तुझे असंख्य थोर थोर भक्त होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांनी कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही मार्गांनी तुला प्राप्त करून घेण्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. मी यातले काहीच कष्ट केलेले नसल्यामुळे मला या भूमीला भार झाल्यासारखे वाटते आहे. रामराया, मी तुझा दास म्हणवतो आहे खरा पण मी व्यर्थ जन्माला आलो असे मला वाटते आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )



No comments:

Post a Comment