Wednesday, April 5, 2023

करूणाष्टक - १५

 


जळचर जळवासी नेणती त्या जळासी ।


निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥


भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी ।


सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥


ज्याप्रमाणे पाण्यातील जलचर आजूबाजूला असणा-या पाण्याला जाणीत नाहीत, हे पाणीच त्यांच्या जीवनाचा आधार आहे हे त्यांच्या गावीही नसते आणि ते त्याच पाण्यात मुक्त, सहज विहार करीत असतात, त्याचप्रमाणे आम्ही मनुष्यमात्र या जगात सर्वत्र व्यापून राहिलेल्या आणि ज्याच्या आधाराने आम्ही जिवंत आहोत अशा त्या परमात्म्याला जाणीत नाही ही आम्ही दिवसरात्र मोठी चूकच करीत असतो. या भूमीवरच्या सकल प्राणीमात्रांनाही ज्याचे वर्णन करता येणार नाही अशा हे रामराया, मला आता तू भेट दे. 


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


No comments:

Post a Comment