Saturday, April 8, 2023

करूणाष्टक - १८

 


सदा प्रेमराशी तयां भेटलासी ।


तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी ॥


अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों ।


तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १८ ॥


हे परमेश्वर, ज्या भक्ताने तुला त्याचे प्रेम अर्पण केले आहे त्यालाच तू भेटला आहेस. तुझ्या स्पर्शाने आणि नुसत्या दर्शनाने भरपूर सुखाची प्राप्ती होत असते. अरे पण देवा माझ्या मनात माझ्या शब्दज्ञानाचा अहंकार इतका दाटलेला आहे आणि त्यातच मी इतका बुडालो आहे की तुझ्याविषयीचे प्रेम माझ्या मनात येतच नाही. म्हणून मी या जगात उगाचच जन्माला आलोय असे मला वाटते आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


No comments:

Post a Comment