गांधीजी जिवंत असताना आणि त्यानंतरही या जागेवर असंख्य भाविकांनी अगदी मनापासून त्या एका वैश्विक शक्तीची प्रार्थना केली असेल.
त्या सगळ्या प्रार्थनांची स्पंदने अजूनही या जागेवर जाणवतात. एकतर तुकोबारायांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" या उक्तीनुसार असे अनेक सोयरे इतिहासाचे मूक साक्षीदार बनून इथे आहेत. त्या असंख्य प्रार्थनांचे साक्षीदार इथली वृक्षराजी, कुटी, भूमी. यांनी ती सगळी स्पंदने ग्रहण केली असतील आणि इथे येणार्या मोकळ्या मनाच्या, निष्पाप जिवांच्या हृदयापर्यंत ती स्पंदने पोहोचवण्याचे काम इथली वृक्षराजी, कुटी, भूमी करत असतेच असते.
आपण फक्त तिथल्या वातावरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न तेवढा करायचा.
- असले निसर्गसन्निध जीवन जगायला मनापासून आवडणारा एक जीव, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
