कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली
दि. ०८/०५/२०११
ही चित्रे कुठेतरी पाहिल्यासारखी वाटतायत ना ? आमच्यापैकी बहुतेकांची हीच अवस्था झाली होती. अहो, आपल्या खिशातली ५०० ची नोट काढून पहा, मग उलगडा होइल.
The famous कुतूब मिनार.
विजय स्तंभ.
कुतूब मिनारावरची अप्रतिम कलाकुसर.
OMG ! पुन्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर की काय ?
केवळ अप्रतिम !
बहाई धर्माचे प्रार्थनास्थळ. आत गेल्यावर खरोखर शांत शांत वाटतं.
दि. ९/५/२०११
नवी दिल्ली ची वाहतूक व्यवस्था अधिकच खुलवणा-या या सुंद-या.
आणि या कुविख्यात डी. टी. सी. बसेस. जुन्या झाल्यात. हळूहळू दिल्लीतून हद्दपार होत आहेत.
इंडिया गेट वरील हा शिलालेख. पहिल्या महायुध्दात ब्रिटीशांसाठी लढलेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ उभारलेले हे स्मारक.
दिल्लीच्या तापट गर्मी पासून वाचण्यासाठी सर्वांनी इंडिया गेटला खरेदी केलेल्या टोप्या.
आणि मजेसाठी सर्वांनी दुपारी केलेली दिल्ली मेट्रो ची सफ़र. सुरूवातीच्या स्थानकावरून उगाचच शेवटच्या स्थानकापर्यंत गेलो आणि परतलो.
संध्याकाळी अक्षरधामला गेलो. जीवनात काहीतरी भव्यदिव्य पाहिल्याचं समाधान लाभलं. दिल्लीला भेट देणा-याने बघायलाच हवा असे हे अक्षरधाम. वर्णनाला शब्द अपुरे. (फ़ोटो वगैरे अजिबातच काढू देत नाहीत.) पण अधिक माहितीसाठी इथे भेट द्या.