Showing posts with label Mumbai depot. Show all posts
Showing posts with label Mumbai depot. Show all posts

Tuesday, March 3, 2026

हेड ऑफ़िसची बस

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय मुंबई सेंट्रल इथे आहे.


मुंबई सेंट्रल डेपोच्या गाडीला आमच्या बसफ़ॅन्समध्ये "हेड ऑफ़िसची गाडी" असे संबोधले जाते.





गणपतीपुळे निम आराम मुंबई


मार्गे रत्नागिरी - चिपळूण - महाड - माणगाव - पेण - पनवेल 


अशोक लेलॅण्ड चित्ता मॉडेल


MH 20 / D 9427


मुं. मुंबई आगार


BS II उत्सर्जन मानकांनुसार बांधलेली निम आराम बस. 


2 बाय 2 आसनव्यवस्था. एकूण 45 आसने.

 

मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेली बस. MH 20 / D सिरीज ही संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आगळीवेगळी आहे कारण MH 20 / D 0001 पासून MH 20 / D 9999 पर्यंत सगळ्या गाड्या एस. टी. च्याच मालकीच्या आहेत. ही सिरीज छत्रपती संभाजीनगर च्या आर. टी. ओ. ने इतर कुठल्याही वाहनांना दिली नव्हती.


या D गॅंगच्या गाड्यांच्या दरा-यावर मी यापूर्वी इथे एक लेख लिहीलेला होता.





मुंबई विभागाच्या एस. टी. बसेसवर मराठीतल्या अतिशय सुंदर फ़ॉन्टने मुं. मुंबई किंवा विभागातल्या इतर डेपोंची नावे लिहीली जायचीत. I am simply in love with that font.


गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009



- एस. टी. नामक प्रेयसीच्या प्रेमातच असल्याने तिची कुठलीही अदा सुंदरच वाटणारा एक आशिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Friday, November 6, 2020

ती परी आमच्या एस. टी. ची

 दि. १९/०३/२०१६ व २०/०३/२०१६ ची मध्यरात्र.

मुंबईवरून इंदूर, जळगाव, धुळे आदि ठिकाणांसाठी प्रवाशांना घेऊन निघालेल्या एकापेक्षा एक आरामदायक खाजगी आरामबसेस मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (NH 3 आता AH 47) हॉटेल ग्रीन व्ह्यु खर्डी येथे जेवणाकरिता थांबलेल्या आहेत.

काही प्रवाशांची जेवणे आटोपली आहेत, काहींची आटोपत आलेली आहेत. इतक्यात सफ़ाईतदार वळण घेऊन आपली हिरकणी तिथे प्रवेश करते आणि जेवण होऊन त्या आवारात शतपावली करीत फ़िरणा-या आणि जेवण करीत असलेल्या सगळ्या प्रवाशांच्या नजरा तिच्या डौलाकडे वळतात.




मुंबईवरून नाशिक जिल्ह्यातले जैन तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे जाणारी निम आराम दर्जाची "हिरकणी" बस तिथे थांबलेली असते. साधेपणात काय सौंदर्य असतं हे जणू सगळ्या उपस्थितांना ती पटवून देत असते.

 मुंबई निम आराम मांगीतुंगी

 मार्गे ठाणे - कल्याण फ़ाटा - नाशिक - सटाणा.

 MH - 20 / BL 3699

 मुं. मुंबई आगार (हेड ऑफ़िसची गाडी. डेपो लिहीण्याचा, मुंबई आगाराचा, टिपीकल वळणदार फ़ॉण्ट)

 (मुंबई आगाराच्या फ़ार कमी हिरकणी गाड्या या मार्गावर धावतात. त्यातलीच ही एक.)

 मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबाद ने बांधलेली २ बाय २ पुशबॅक सीटांची निम आराम बस.

 ASHOK LEYLAND CHEETAH model. BS III standard.

 २०/०३/२०१६. मध्यरात्री १२ वाजून १७ मिनीटांनी काढलेले फ़ोटो.