दि. १९/०३/२०१६ व २०/०३/२०१६ ची मध्यरात्र.
मुंबईवरून इंदूर, जळगाव, धुळे आदि ठिकाणांसाठी प्रवाशांना घेऊन निघालेल्या एकापेक्षा एक आरामदायक खाजगी आरामबसेस मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (NH 3 आता AH 47) हॉटेल ग्रीन व्ह्यु खर्डी येथे जेवणाकरिता थांबलेल्या आहेत.
काही प्रवाशांची जेवणे आटोपली आहेत, काहींची आटोपत आलेली आहेत. इतक्यात सफ़ाईतदार वळण घेऊन आपली हिरकणी तिथे प्रवेश करते आणि जेवण होऊन त्या आवारात शतपावली करीत फ़िरणा-या आणि जेवण करीत असलेल्या सगळ्या प्रवाशांच्या नजरा तिच्या डौलाकडे वळतात.
मुं. मुंबई आगार (हेड ऑफ़िसची गाडी. डेपो
लिहीण्याचा, मुंबई आगाराचा,
टिपीकल वळणदार फ़ॉण्ट)
No comments:
Post a Comment