Wednesday, November 18, 2020

चंद्रपूर विभागातली लेलॅण्ड.

 साधारण १९९८ च्या सुमारास मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद ने बांधलेल्या MH 20 / D 40XX  आणि नंतर २००० च्या सुमारास MH 20 / D 50XX सिरीजच्या लेलॅण्ड चंद्रपूर विभागाच्या अहेरी डेपोत आल्यात आणि त्यांनी नंतर साधारण २००५ पर्यंत धुमाकूळ घातला. चंद्रपूर बसस्थानकाच्या नागपूर फ़लाटांवर लगेच सुटणा-या चंद्रपूर - नागपूर टाटा बस पेक्षा जर १० मिनीट उशीरा सुटणारी अहेरी - नागपूर लेलॅण्ड बस उभी असेल तर जाणकार मंडळी आपले आसन त्या नंतरच्या बस मध्ये हलवायचीत. कारण त्या बसेसचा वेग उत्कृष्ट होता आणि ६५ किमी प्रतितास स्पीडलॉक असणा-या टाटा बसेसपेक्षा ८० ते ८५ किमी प्रतितास जाणारी ही लेलॅण्ड नागपूरला लवकर नेऊन पोहोचवेल हे जाणकार प्रवाशांना माहिती होते. 


आता पुन्हा चंद्रपूर विभागात राजुरा आगाराला एम एस. बॉडीच्या लेलॅण्ड मिळाल्यात. एम. जी. जाहिराबाद ने बांधलेल्या MH 13 / CU 63XX सिरीज च्या राजुरा डेपोच्या बसेस राजुरा - तुमसर मार्गावर धावताना गेल्या वेळी बघितल्या होत्या. काल दुपारी मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद ने नवीन VIKING चेसीसवर बांधलेल्या एम. एस. बॉडी बसचे दर्शन झाले. 


दि. १७/११/२०२०. दुपारी १५. १७ वाजता, वरोरा आणि जांबमध्ये आम्ही ८० किमी प्रतितास वेगाने आम्ही जात असताना ही बस दुरून दिसली. ही बसही साधारण त्याच वेगात आणि डौलात चालली होती. 


आता सध्या महाराष्ट्रात एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळांनी बांधलेल्या MH 14 / HG 82XX , MH 31 / FC 36XX, MH 40 / BL 40XX आणि MH 20 / EL 21XX सिरीजच्या एम एस बॉडी बसेस अगदी थोड्या आहेत. बाकी सगळ्या एम जी जाहिराबाद ने बांधलेल्या MH 13 / CU सिरीजच्या बसेस. कालची ही बस दुर्मीळ होती.

MH 20 / EL 2197

राजुरा जलद काटोल.

मार्गे बल्लारपूर - चंद्रपूर - भद्रावती - वरोरा - जांब - नागपूर - कळमेश्वर.

चं. राजुरा आगार (राजुरा आगार, चंद्रपूर विभाग)

मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद बांधणीची 
ASHOK LEYLAND VIKING मॉडेल,

Front Long Overhang

काही दिवसातच राजुरा डेपोत नवीन एम एस बॉडी टाटा बसेस आल्यात की या लेलॅण्ड गाड्या पुन्हा मराठवाडा, खान्देश किंवा कोकणात पाठवतील.

- प्रवासी पक्षी, राम.




No comments:

Post a Comment