सांगोल्याला असताना मागे एकदा आमच्या चुलतभावाकरिता वधू संशोधनासाठी आम्ही पंढरपूरला एका ठिकाणी गेलो. मुलगा नागपूरचा आहे हे ऐकल्यावर त्यांचा लागलीच नकार आला. आणि "इथल्या कुठल्याच घरातून इतक्या लांब मुलगी कुणी देणार नाही" हे ही ऐकायला मिळाले.
त्यांचही बरोबरच होत म्हणा. सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचे जग माहिती नसणा-या एका साध्या माणसाची ही प्रतिक्रिया होती. कोल्हापूर आणि पुणे म्हणजे त्यांच्यासाठी राजधानीचे शहर होते आणि मुंबई म्हणजे परदेशात राहून आल्याइतके ग्रेट. नागपूर आणि विदर्भ म्हणजे लातूरच्या ईशान्येला असलेला एक झाडीपट्टीचा प्रदेश एव्हढीच समजूत दृढ होती.
इकडे विदर्भात मात्र पुण्या मुंबईच स्थळ म्हणजे वैदर्भीय मुलींना आकाश ठेंगणे होते पण पश्चिम महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या मुली विदर्भात नांदायला नाखुष असतात. सोयरिकी होत नाहीत.
पण आपली एस.टी. तशी नाही. आता ही औरंगाबादची नवथर तरूणी अगदी विदर्भातल्या झाडीपट्टीत, तुमसरला सुखाने नांदते आहे.
तुमसर जलद राजुरा
मार्गे भंडारा, नागपूर, जांब, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर
MH 20 / BL 4205
TATA 1512 C model
मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबाद ने बांधलेली टाटा बस.
औरंगाबाद कार्यशाळा प्रामुख्याने लेलॅण्डच्या चेसिसवर बसेस बांधते. औरंगाबाद बांधणीच्या टाटा बसेस अगदी ५ % असतील. याउलट नागपूर कार्यशाळा टाटाच्याच बसेस बांधते. नागपूर बांधणीच्या लेलॅण्ड म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात १ % असतील.
Photographed at Rahate Colony, Nagpur
01/11/2016. 16.50
No comments:
Post a Comment