Wednesday, November 4, 2020

महाराष्ट्र एस. टी तल्या वैशिष्ट्यपूर्ण टाटा

 महाराष्ट्रातल्या एस. टी च्या दोन्ही मध्यवर्ती कार्यशाळांनी {मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद (म. का. औ.) आणि मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर (म. का. ना.)} , मधल्या काही काळात, टाटा गाड्यांचे समोरचे स्टॅण्डर्ड काऊल ठेवण्याऐवजी नवे काऊल डिझाईन करून बसविण्याचा प्रकार केलेला होता. 


टाटाचे मूळ काऊल.

तशाही औरंगाबाद कार्यशाळेत टाटाच्या गाड्या कमीच बांधल्या जातात. टाटा गाड्यांची बांधणी प्रामुख्याने दापोडी आणि नागपूर कार्यशाळाच करतात. पण आजवर टाटाने दिलेल्या स्टॅण्डर्ड काऊल वापरून बसेस बांधणी करणे अचानकच या कार्यशाळांनी थांबवले. कदाचित टाटा मोटर्सने एस. टी. ला स्टॅण्डर्ड काऊल्स पुरवणे तात्पुरते थांबवले असावे.

नागपूर कार्यशाळेने MH -31 /  83XX  आणि  84XX सिरीजमध्ये

औरंगाबाद कार्यशाळेने MH - 20 / D 80XX ते D 82XX सिरीजमध्ये अशा विशिष्ट काऊल्सच्या बसेस बांधल्यात.




















मग पुन्हा काय झाले ते कळले नाही. पण यानंतर पुन्हा टाटा गाड्यांना स्टॅण्डर्ड टाटा काऊल्स दिसणे सुरू झाले. 

पण मधल्या काळात बांधलेल्या  या गाड्या अगदी एवंगुणविशिष्ट होत्या.


- एस. टी. तल्या सूक्ष्म बदलांची नोंद घेणारा प्रवासी पक्षी, राम



2 comments:

  1. अत्यंत आवश्यक माहिती चा प्रसार करणारा blog 😍😍 awesome sir

    ReplyDelete