Wednesday, November 11, 2020

पाणीपुरी आणि तत्वचर्चा

 पुल म्हणतात,

"मसाला पान खाऊन गिळून टाकण्यार्या गिर्हाईकापेक्षा दुकानासमोरच पिंक टाकणारे गिर्हाईक पानवाल्याला आवडत"
तस....
मला वाटत की पाणीपुर्या खाल्ल्यानंतर नुसतीच कोरडी मसाला पपडी मागणार्या गिर्हाईकांपेक्षा,
पाणीपुरीची प्लेट पुढे करून "भैय्या, जरा और पानी दो ना" म्हणून पाणी पिऊन तृप्ततेची ढेकर देणारं गिर्हाईक जादा भावतं.



बरं, मला काही अनुभव आलेत ते आपल्यासमोर मांडतोय. I think you will agree.
१. महालक्ष्म्यांच्या (गौरींच्या) दिवशी जशी दाळभाजी बनते तशी पुन्हा वर्षभर बनत नाही. त्यादिवशी पानात असलेल्या अक्षरशः पक्वानांची गर्दी असते आणि त्यात या दाळभाजीला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही या जाणीवेने मन खंतावत राहते.
२. गणपतींच्या १० दिवसांमध्ये पाणीपुरी खाण्याची अतीव म्हणतात अशी इच्छा होते. घरी सकाळ संध्याकाळ गोड खाल्ल्यानंतर बाहेर फिरताना भेळ पाणीपुरीचा ठेला दिसल्यावर पाणीपुरी खाण्याची जी अनावर इच्छा होते त्याला तोड नाही.
३. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळ्यांकडेच गेल्यावर चिवडा, करंजी, लाडू, चकल्या, शेव आणि तत्समच पदार्थ खायला असतात. अशावेळी मला पांढरीशुभ्र वाफाळती इडली आणि सोबत सुंदर आंबटगोड सांबार खाण्याची खूप इच्छा होते.
कुसुमाग्रज म्हणतातच,
"व्योमातून उडताना
ओढीतसे मज घरटे
अन उबेत त्या घरट्याच्या
क्षुद्र तेच मज गमते."
— पाणीपुरी खातानाही, साहित्य संगीत कला आदिंविषयी तत्वविचार मनात सुरूच असणारा, पण खवैय्या रामभाऊ.

No comments:

Post a Comment