मार्गफ़लक दडवून केबिनमध्ये ठेवला म्हणून मार्ग दडत नाही.
Friday, May 28, 2021
मार्गफ़लक केबिनमध्ये दडवलेली बस.
मार्गफ़लक दडवून केबिनमध्ये ठेवला म्हणून मार्ग दडत नाही.
Wednesday, November 18, 2020
चंद्रपूर विभागातली लेलॅण्ड.
साधारण १९९८ च्या सुमारास मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद ने बांधलेल्या MH 20 / D 40XX आणि नंतर २००० च्या सुमारास MH 20 / D 50XX सिरीजच्या लेलॅण्ड चंद्रपूर विभागाच्या अहेरी डेपोत आल्यात आणि त्यांनी नंतर साधारण २००५ पर्यंत धुमाकूळ घातला. चंद्रपूर बसस्थानकाच्या नागपूर फ़लाटांवर लगेच सुटणा-या चंद्रपूर - नागपूर टाटा बस पेक्षा जर १० मिनीट उशीरा सुटणारी अहेरी - नागपूर लेलॅण्ड बस उभी असेल तर जाणकार मंडळी आपले आसन त्या नंतरच्या बस मध्ये हलवायचीत. कारण त्या बसेसचा वेग उत्कृष्ट होता आणि ६५ किमी प्रतितास स्पीडलॉक असणा-या टाटा बसेसपेक्षा ८० ते ८५ किमी प्रतितास जाणारी ही लेलॅण्ड नागपूरला लवकर नेऊन पोहोचवेल हे जाणकार प्रवाशांना माहिती होते.
आता पुन्हा चंद्रपूर विभागात राजुरा आगाराला एम एस. बॉडीच्या लेलॅण्ड मिळाल्यात. एम. जी. जाहिराबाद ने बांधलेल्या MH 13 / CU 63XX सिरीज च्या राजुरा डेपोच्या बसेस राजुरा - तुमसर मार्गावर धावताना गेल्या वेळी बघितल्या होत्या. काल दुपारी मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद ने नवीन VIKING चेसीसवर बांधलेल्या एम. एस. बॉडी बसचे दर्शन झाले.
दि. १७/११/२०२०. दुपारी १५. १७ वाजता, वरोरा आणि जांबमध्ये आम्ही ८० किमी प्रतितास वेगाने आम्ही जात असताना ही बस दुरून दिसली. ही बसही साधारण त्याच वेगात आणि डौलात चालली होती.
Saturday, November 7, 2020
सर्वसमावेशक अशी आमची एस. टी.
सांगोल्याला असताना मागे एकदा आमच्या चुलतभावाकरिता वधू संशोधनासाठी आम्ही पंढरपूरला एका ठिकाणी गेलो. मुलगा नागपूरचा आहे हे ऐकल्यावर त्यांचा लागलीच नकार आला. आणि "इथल्या कुठल्याच घरातून इतक्या लांब मुलगी कुणी देणार नाही" हे ही ऐकायला मिळाले.
त्यांचही बरोबरच होत म्हणा. सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचे जग माहिती नसणा-या एका साध्या माणसाची ही प्रतिक्रिया होती. कोल्हापूर आणि पुणे म्हणजे त्यांच्यासाठी राजधानीचे शहर होते आणि मुंबई म्हणजे परदेशात राहून आल्याइतके ग्रेट. नागपूर आणि विदर्भ म्हणजे लातूरच्या ईशान्येला असलेला एक झाडीपट्टीचा प्रदेश एव्हढीच समजूत दृढ होती.
Thursday, January 17, 2013
पुन्हा नागपूर - १
त्यानंतर चौपदरी रस्ता होता. चांगला होता. फ़क्त मध्ये मध्ये टोल नाक्यांवर वेळ जायचा. सगळा टोल एकत्रच वसूल केला असता तर बरे. किमान प्रत्येक २५ किमी वर असलेल्या नाक्यांवर थांबण्याचा आणि वाहतूक खोळंब्याचा त्रास तर वाचला असता असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला इतकच.
औरंगाबाद सोडले, मात्र रस्त्यावर छान छान धाब्यांच्या जाहिराती दिसायला लागल्या. जालना रोडवर एकापेक्षा एक छान धाबे आहेत. भूक तशी फ़ार नव्हती पण जालना झाल्यानंतर मेहेकर पर्यंत मध्ये काही मिळणार नाही याची जाणीव झाली. मेहेकर गाठायला दुपारचे तीन साडेतीन तरी झाले असतेच मग जालन्याआधी २० किमी "अमृतसर पंजाबी" मध्ये आम्ही जेवायला थांबलोत.
मग मात्र पुन्हा लांब पल्ल्यावर निघाल्यागत निघालो. आता प्रवाशांतर्फ़े कुणीही जागे नव्हते. जालना शहरातून मेहेकर मार्गाला लागलो. पुन्हा एकदा जालना शहरा (?) तल्या "दिव्य" रस्त्यांचा व बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागला.
वर्ग ३ रा. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. हे वर्ष शाळेची १०० वर्षे पूर्ण झाल्याचे वर्ष होते. बक्षिसाची गुणवत्ता किती घसरली पहा. उत्तम कल्पनांचा किंवा प्रबळ इच्छाशक्तिचा अभाव. दुसरं काय ?
आणि हे पारितोषिक घ्यायला आम्ही ८०० किमी प्रवास करून गेलो. वर्ग ४ था. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. निर्गुण, निराकार. याच वेगाने संस्थेचे अधःपतन सुरू राहिले तर पुढच्या वर्षी केवळ कागदाचा चिठ्ठीएव्हढा तुकडाच बक्षिस म्हणून वाटतील.


