Tuesday, March 1, 2011

मराठी भाषा दिन

स्वार

घनदाट अरण्यामधूनी, बेफ़ाम दौडतो स्वार,
अवसेची राक्षस रात्र, साचला नभी अंधार.

स्तब्धात नादती टापा, खणखणत्या खडकांवरती,
निद्राळ तरुंच्या रांगा, भयचकीत होऊनी बघती.

गतिधुंद धावतो स्वार, जखमांची नव्हती जाण,
दूरातील दीपासाठी, नजरेत साठले प्राण.

मंझिल अखेरी आले, तो स्फ़टीकचि-यांचा वाडा,
पाठीवर नव्हता स्वार, थांबला अकेला घोडा.

वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)

एका माणसानं किती ध्येयवादी असावं, याचं हा स्वार उत्कृष्ट उदाहरण आहे अस मला वाटतं.

4 comments:

  1. खरच ध्येयवाद शिकवणार सुंदर लिखाण आहे हे!
    मला फ़ार आवडल.

    ReplyDelete
  2. I think its the determination to reach the destination. That was so strong that it got transformed to the animal too.

    ReplyDelete
  3. सुंदर शब्दांमधे मार्मिक संदेश ....अप्रतिम ....सर्व मराठी भाशिकांने आज तरी मराठी भाषे चा वापर करावा ..ही विनंती..

    ReplyDelete