Friday, July 13, 2012

कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली

आग्रा मथुरा, वृंदावन करायचं म्हटलं तर सुरूवात दिल्लीपासूनच करावी लागते. आमचा ४५ जणांचा ग्रुप भर उन्हाळ्यात अश्या सहलीला निघाला. रेल्वे रिझर्वेशन्स अगदी ९० दिवस आधीपासूनच केलेली होती त्यामुळे मजा होती. २००६ च्या दिल्ली-कटरा-वैष्णोदेवी-हरिद्वार सहलीत जे निसटलं ते कवेत घेण्यासाठी मी सज्ज होतो.


दि. ०७/०५/२०११


नागपूर स्थानक. फ़लाट क्र. २. २२२६९ WAP 4. १२६२२ तामिळनाडू एक्सप्रेसला घेऊन येताना.


लालागुडा शेड चे ३०२८६ WAP 7आमच्या अगोदर जाणा-या १२४९३ बंगलोर-निजामुद्दीन राजधानीला घेऊन आमच्याच फ़लाटावर (फ़लाट क्र. १) येताना.



१२४९३ बंगलोर-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस.या गाडीची आरक्षणं मिळाली असती तर बहार आली असती.


नागपूर ते नवी दिल्ली



१२७२१ डाउन हैद्राबाद नवी- दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस


नागपूरवरून घेतलेली साल्पेकरांची "शेगाव कचोरी". प्रवासात सुरूवात तर मोठी झकास झाली.


दि. ०८/०५/२०११ 



सकाळ आग्रा स्टेशनात झाली. WAP 5 व WAP 1. भारतीय रेल्वेचे दोन खंदे योद्धे.


हे महाशय ह्या कपड्यांमध्ये फ़ार कमी आढळतात (Agra shed WDM in distinct livery)


पलवल ते नवी दिल्ली या स्थानकांदरम्यान चार रेल्वे मार्ग असल्याने असे ओव्हरटेक फ़ार बघायला मिळतात. आत्ता आम्ही या बिचा-या मालगाडीला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केलाय खरा पण नंतर मुंबई वरून येणा-या राजधानीनेही आम्हाला धावता धावता ओव्हरटेक केला. कॆमेरा काढून चित्रीकरण करतोय न करतोय तोच राजधानी पसारपण झाली होती.


सूर्योदय मथुरेत झाला.


उत्तरेकडील मैदानी प्रदेशात आढळणारे हे सर्वसामान्य दृश्य. या विशिष्ट आकाराच्या झोपड्या छान वाटतात.




गाडीतली आळसावलेली सकाळ. स्टेशन आता जवळच आहे. आत्ता अगदी तासाभरात उतरायचच आहे ही भावना आली की सकाळ अधिकच आळसावलेली होत असावी बहुधा.




मुंबईतल्या लोकल्स सारख्याच पण चित्रविचित्र रंगांच्या या मेमू नी आमच दिल्ली परिसरात स्वागत केलं.


अरे ही तर आपली अमृतसर-बिलासपूर छत्तीसगढ एक्सप्रेस ! महाराष्ट्र एक्सप्रेस सारखीच बिचारी सावत्र वागणूक सहन करते. नागपूर ते दिल्ली हा प्रवास खूप सगळे थांबे घेत घेत लेकुरवाळी गाडी जवळपास २२ तासात पूर्ण करते.


काय नंबर आहे या मालगाडीच्या एंजिनाचा! वा! आणि शेजारचे १५१४ हे मुंबई पासूनचे किलोमीटर्स बरं का.



निजामुद्दीन स्थानकात सायडिंगला उभे असलेले राजधानी आणि दुरांतो एक्सप्रेसचे रेक्स.


हे महाशय (WDP 3 A) फ़क्त दिल्ली आणि परिसरातच दिसतात बर का. यांचे धाकटे बंधू (WDP 3) लांब तिकडे तामिळनाडू आणि केरळात दिसतात. पनवेल पर्यंत तिरूवनंतपुरम राजधानीसोबत ब-याचदा येतात.


नवी दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच हे वळण. वळणावर पूर्ण दिसणारी आमची गाडी. जरा विसावू या वळणावर. (की वळणानंतर ?)





पोचलो बुवा एकदाचे ! हुश्श. 


नवी दिल्लीतल्या आमच्या तात्पुरत्या वसतीस्थानापर्यंत घेउन जाणारी बस



नवी दिल्लीतल्या नुकत्याच राष्ट्रकूल खेळांसाठी आलेल्या सुंदरी. पूर्वीच्या डी. टी. सी. बसेस पेक्षा कितीतरी पट सरस. (त्याच बरोबर मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ही प्रगती का नाही झाली ? ही खंत. २००६ मधली दिल्लीतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि आत्त्ताची व्यवस्था यात खरोखर जमीन अस्मानाचा फ़रक जाणवत होता.)

या लेखातल्या रेल्वे विषयक तांत्रिक बाबींची (WAP, WAM, WDM etc .) उत्सुकता असेल तर इथे बघा.

2 comments:

  1. ते तुम्हाला विचित्र नाव वाटलेलं WAG 7 आणि बंगलोर निझामुद्दीन राजधानीचं WAP 7 ह्यांचा प्लॅटफॉर्म एकच आहे. वॅगमधे पॅसेन्जर्स न्यायच्या दृष्टीने थोडेफार बदल करून वॅप झालं. रच्याकने ही दोन्ही इंजिन्स मला वाटतं पूर्णपणे भारतीय बनावटीची असून तूर्तास सर्वा वेगवान आणि शक्तीशाली आहेत. त्यामुळे राजधानीच्या जर्मन कोचेस न्या फुलस्पीडमधे पळवत नेतात... :)

    ReplyDelete
  2. The platform for WAP 7 and WAG 9 is the same. (Not WAG 7). The gear ratio in Passenger (P) type locos is adjusted to have more speed and less torque whereas the gear ratio for Goods (G) type locos need to create more torque while speed is the secondary issue.

    ReplyDelete