Saturday, April 1, 2023

करूणाष्टक - ११

 


स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।


रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥


जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती ।


विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥


ज्यांना आपण आपले जिवलग मानत आलो ती सगळी मंडळी आपल्या देहातले चैतन्य संपल्यानंतर आपल्यावर प्रेम करीत नाहीत. त्यामुळे स्वतःचे हे शरीर, स्वतःचे नातेवाईक, स्वतःचे धन या नश्वर गोष्टींचा मला आता काहीही आनंद नाही. एका रामाशिवाय आता माझे चित्त कुठेच रमत नाही. जर मी रामाला सोडून केवळ या जगातल्या विषयांमध्येच जर रमलो तर ते विषय मला पुन्हा हा नश्वर देह, त्यातले जिवलग, त्यातले विषय प्राप्त करून देणारा जन्म पुन्हा देतील.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )

No comments:

Post a Comment