Saturday, May 8, 2021

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सबसे बडा रूपय्या.

 श्रध्दा अंधश्रध्देच्या हिंदोळ्यावर झुलणारा, आपल्या सगळ्यांच्याच बालपणीचा एक काॅमन प्रसंग.

घरोघरी जाऊन कुल्फी विकणार्या विक्रेत्यांकडे मिळणार्या "कुल्फीवर मीठ भुरभुरवले की त्यातून अळ्या निघतात."
आई बाबांनी , घरातल्या इतर मोठ्या माणसांनी सांगितलेली गोष्ट खोटी कशी असेल ? हा एक प्रश्न. आई बाबांवर आणि इतर वडीलधार्यांवरच्या विश्वासाचा.
आणि
पण थंड केलेल्या दुधातून अळ्या निघतीलच कशा ? हा दुसरा प्रश्न. बुध्दीप्रामाण्यवादाचा.
पण बुध्दीप्रामाण्यवादावर विश्वास ठेऊन खरोखर तसा (कुल्फीवर मीठ टाकून पाहण्याचा) प्रयोग करून पहायचा धीरच व्हायचा नाही. कारण वर्षभरातून फक्त उन्हाळ्यात खायला मिळणार्या डझन, दोन डझन कुल्फ्यांपैकी अख्खी एक कुल्फी अशा प्रयोगासाठी वाया घालवणे आमच्या अर्थव्यवस्थेला परवडण्याजोगे नव्हते.
शेवटी श्रध्दा काय किंवा बुध्दीप्रामाण्यवाद काय ?
"The whole thing is that,
के भैय्या
सबसे बडा रूपय्या." इथेच येऊन विसावणार.

- बालपणापासूनच श्रध्दाळू असलेला अर्थशास्त्री, रामशास्त्री किन्हईकर.



No comments:

Post a Comment