Sunday, May 9, 2021

मास्क खरेदी आणि बरच काही.

 "अहो, यात दुसरा रंग नाही का ?

काॅटनचा पोत जरा भरड वाटतोय, नाही ? थोडा मऊ पोताचा नाही का ?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा रंग म्हणजे अधिक गर्मी होईल, दुसरा लाइट रंगात दाखवा बर"
हे संवाद कुठल्याही कापड दुकानातले नाहीत. औषधांच्या दुकानात आमच्यापुढे उभे असलेले काका आणि काकू त्या विक्रेत्याशी मास्कबद्दल चर्चा करीत होते, त्यातले हे संवाद आहेत.
पूर्वी हिमालयातून मनःशांती कमावलेल्या योग्यांनंतर, मनःशांती कमावलेल्यांमधे कापड दुकानातल्या विक्रेत्यांचा नंबर लागायचा.
आता औषध विक्रेत्यांचा नंबर त्यांच्यात लावावा लागेल.
मास्कसाठी एव्हढं तर स्वतःच्या साडीसाठी / काकांच्या शर्टपँटसाठी किती ? हे त्रैराशिक मांडत रांगेतला आमचा वेळ छान गेला.
- १० मिनीटे एवढा संवाद करून शेवटी पांढरा शुभ्र मास्क घेऊन बाहेर पडलेल्या काकूंना साष्टांग दंडवत घालायला चुकल्यामुळे चुटपुटत राहिलेला, स्वतः साधा निळा मास्क वापरणारा नागरीक, रामभाऊ काळजीवाहू.

2 comments: