Saturday, May 29, 2021

सप्तगिरी एक्सप्रेस livery

 चेन्नई आणि तिरूपती दरम्यान धावणा-या सप्तगिरी एक्सप्रेस गाडीच्या रंगसंगतीला मॅचिंग असलेले अरक्कोणम शेडचे एंजिन.

चेन्नईवरून सकाळी ६.२५ ला निघणारी आणि भाविकांना सव्वातीन तासात १४७ किमी अंतर कापून तिरूपतीला सकाळी ९.४० ला पोहोचवणारी, एखाद्या भाविकाने दर्शनाचे बुकिंग केले असल्यास दिवसभर त्याला भगवान गिरीबालाजी, आई पदमावतीच्या दर्शनासाठी मोकळीक देणारी आणि परतीच्या प्रवासात संध्याकाळी १८.१० ला तिरूपतीवरून निघून रात्री २२.०० वाजता चेन्नईतल्या भाविकाला त्याच्या घरी परत सोडणारी ही अतिशय सोयीची गाडी.
ही गाडी दक्षिण रेल्वेची अतिशय लाडकी गाडी नसल्यासच नवल होते. मध्य रेल्वेच्या लाडक्या डेक्कन क्वीन प्रमाणे या दक्षिण रेल्वेच्या या लाडक्या गाडीसाठी विशेष रंगसंगती, विशेष कोचेसचा रेक हे सगळे लाड होतेच.
आता सप्तगिरी एक्सप्रेसची ही विशेष रंगसंगती इतिहासजमा झालीय आणि अरक्कोणम शेडचे हे WAM 4 एंजिनही. उरल्यात त्या आठवणी.




Sapthagiri Express captured from my hotel room in Tirupati.

Sapthagiri Liveried WAM 4
Southern Railway's Arakkonam shed is one of the prominent electric loco sheds in S. R. It used to hold WAM 4 type of locomotives, too.
The shed painted a few of its locomotives in "Sapthagiri Express" livery. Sapthagiri Express is a daily train that runs between Chennai and Tirupati at very convinient timings for devotees in Chennai. The train had special livery and Arakkonam shed had painted locomotives to match that livery.
Now Arakkonam has no WAM 4 loco left in its fleet. Its WAP 4 locos haul prestigious Super Fast trains like Grant Trunk Express and Tamilnadu express.
Drawing credit : Mrunmayi Kinhikar

No comments:

Post a Comment