Sunday, May 23, 2021

इकडे आड तिकडे विहीर आणि गरीब बिच्चारे पुरूष

 परम पूजनीय ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात की विशिष्ट वयानंतर गृहस्थाने आपल्याच संसारात पाहुण्यासारखे रहावे, अजिबात संसारचिंता न करता अलिप्त जगावे.

सध्या लाॅकडाऊनमुळे घरात असल्याने घरात आणि विशेषतः स्वयंपाकघरात अस्मादिकांचा वावर आणि लुडबूड वाढलेली आहे. एखादी भाजी, वरण फोडणीला टाकणे, एकवेळेची भांडी घासून टाकणे वगैरे.
आज सकाळपासून परम पूजनीय महाराजांच्या उपदेशानुसार घरात पाहुणेपणाची भूमिका घेऊन "हे करू का गं ? ते करू का गं ?" असे प्रश्न गृहस्वामिनीला विचारून विचारून कामे सुरू केलीत. सगळ्यात मुख्य म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी "स्वयंपाक काय करू ?" या प्रश्नाला उत्तरच दिले नाही. खूपच आग्रहानंतर "बघ, तुला जे वाटेल ते कर. माझा काही विशेषाग्रह नाही." असे मोघम उत्तर दिले. आणि काय सांगू...?
प्रचंड गैरसमज झाला हो. मला घरातली कामे करण्याचा एकूण कंटाळा आलेला असावा असा निष्कर्ष better half ने काढला.
आता काय करावे ? कुणीतरी "गरीब बिच्चारे पुरूष" म्हणूनच ठेवलेले आहे. सरळ प्रवृत्तीने घरात कामे करावीत तर ती "लुडबुड" ठरते आणि निवृत्त मनाने, पाहुण्यासारखे घरात वावरावे म्हटले तर तो "जबाबदार्यांपासून पळ" ठरतो.
- "इकडे आड तिकडे विहीर" या म्हणीचा यथार्थ अनुभव घेत असलेला एक प्रापंचिक, रामभाऊ निवृत्ते.

No comments:

Post a Comment