Saturday, May 22, 2021

Iron Dome in Indian culture.

 परवा इस्राईल ची ती Iron Dome सुरक्षा प्रणाली बघितली आणि माझ्या डोळ्यापुढे वैदर्भिय अष्टविनायकांमधला रामटेक येथील "अष्टादशभुज गणेश" च उभा राहिला. आणि नकळत "अव पश्चात्तात्, अव पुरस्तात्, अव उत्तरात्तात्, अव दक्षिणात्तात्, अव च उर्ध्वात्तात्, अव अधरात्तात्. सर्वतो माम् पाहि पाहि समंत्तात्" हेच आठवले.




आणि आपल्या सर्वांच्या मातृरूप दुर्गाम्माही आठवल्यात. प्राच्यां रक्षतु माम् ऐंद्री, आग्नेय्यां अग्निदेवता..." वगैरे झरझर स्मरत गेले.



आपल्याही देवीदेवतांनी हे "कवच" आपल्याभोवती निर्माण करण्याची ग्वाही आपल्याला दिलीय. पण त्याचा अनुभव घेण्यास अटही टाकलेली आहे.
"अनन्याश्चिंतयन्तो माम्, ये जनाः पर्यूपासते.
तेषां नित्याभियुक्तानां,
योगक्षेमं वहाम्यहम"
"माझे तुझ्याशिवाय कुणीही नाही रे भगवंता" या अनन्यशरण भावनेतूनच अशा भक्ताभोवती असा Iron Dome तयार करून त्याचे सर्वस्वी रक्षण करण्याची जबाबदारी त्या उपास्य दैवतावर येते.
स्वकर्तृत्वाचा अहंकार तिथे समूळ सोडावा लागतो आणि तीच सगळ्यात कठीण पायरी आहे.
- राम प्रकाश किन्हीकर
अक्षय्यतृतीया, शके १९४३.

2 comments: