Showing posts with label WAM 4 loco. Show all posts
Showing posts with label WAM 4 loco. Show all posts

Monday, May 20, 2024

रंग माझा वेगळा : भिलाई शेड WAM 4 आईसक्रीम रंगसंगती

मार्च १९७१ : पश्चिम बंगालमधल्या चित्तरंजन इथल्या इंजिन कारखान्यातून पहिले WAM 4 प्रकारचे एंजिन बाहेर पडले आणि भारतीय रेल्वेच्या सेवेत दाखल झाले. त्याचे नामकरण "रजत आभा" असे करण्यात आले आणि ते एंजिन तत्कालीन दक्षिण पूर्व (सध्याचे दक्षिण पूर्व मध्य) रेल्वेच्या भिलाई लोकोमोटिव्ह शेडमध्ये दाखल झाले. त्या एंजिनाचा नंबर होता 20400.


३८५० अश्वशक्तीच्या आणि १२० किलोमीटर प्रतितास हा महत्तम वेग घेऊ शकणा-या या एंजिनांनी १९७१ पासून थेट २०१५ भारतीय रेल्वेवर धावणा-या अनेक रेल्वेंगाड्यांना वेग दिला. भारतीय रेल्वेवरील एका एंजिनाचे आयुष्य साधारण ३० - ३२ वर्षे असते. त्यामुळे ही एंजिने हळूहळू सेवेतून निवृत्त झालीत.


नवे असताना एकेकाळी या एंजिनांनी राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस सारख्या प्रतिष्ठित गाड्यांना वाहून नेले असेल. गीतांजली एक्सप्रेस, तामिळनाडू एक्सप्रेस, आंध्रप्रदेश एक्सप्रेस यासारख्या अनेक प्रतिष्ठित सुपरफ़ास्ट गाड्यांना वेग प्रदान केला असेल.हळूहळू थकत गेल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रे्स, कुर्ला - शालिमार एक्सप्रेस सारख्या नावाच्याच एक्सप्रेस असलेल्या गाड्यांसोबतही ही एंजिने रमली असतील. शेवटी शेवटी तर अनेक पॅसेंजर गाड्यांनाही या एंजिनांनी वाहिले असेल.


नवनवीन, जास्त ताकदवान, जास्त वेगवान अशा WAP 4, WAP 5, WAP 7 अशा एंजिनांची निर्मिती झाली आणि या WAM 4  एंजिनांनी हळूहळू निवृत्ती स्वीकारली. सगळ्यात शेवटी २०१९ मध्ये शेवटचे WAM 4  भारतीय रेल्वेवर धावले आणि आता फ़क्त शंटिंग वगैरे कार्यासाठी थोड्याफ़ार स्टेशनात उरून ह्या प्रकारची एंजिने नाहीशी झालीत.


खूप रंगसंगतींमध्ये रंगवलेली एंजिने हे या प्रकारच्या एंजिनांचे वैशिष्य़ होते. यापूर्वी फ़क्त डिझेल एंजिने वेगवेगळ्या रंगसंगतींमध्ये यायचीत. त्यापूर्वीची वाफ़ेवरची एंजिने एकजात सगळी कोळशासारखी काळीकुट्ट. नाही म्हणायला त्यांच्या कोळसा व पाणी वाहून नेणा-या "टेंडर" भागाला त्यांच्या त्यांच्या शेडनुसार वेगवेगळा रंग असायचा. वर्धा शेडचा हिरवा, भुसावळ शेडचा निळा, भिलाई शेडचा लाल वगैरे. पण डोळ्यात भरणारा रंग म्हणजे त्यांच्या बॉयलरच्या भागाचाच. अगदी काळा. 


पण ही WAM 4  एंजिने शेडगणिक वेगवेगळा रंग धारण करीत गेलीत. कधीकधी तर एकाच शेडची एंजिने तीन चार वेगवेगळ्या रंगसंगतीत दिसायचीत. भारतभर विविध रंगांची उधळण करीत जाणारी ही WAM 4  एंजिने.



या स्केचमध्ये दाखविलेल्या रंगसंगतीला आईसक्रीम रंगसंगती असे आम्ही रेल्वेफ़ॅन्स म्हणायचोत.


स्केच श्रेय : मृण्मयी राम किन्हीकर. 


Wednesday, May 26, 2021

विजयवाडा शेडचे "बार्बी डॉल" एंजिन.

गुलाबी आणि चंदेरी रंगसंगतीच्या या एंजिनांना "बार्बी डॉल" असे नामाभिधान आम्हा सर्व रेल्वे फ़ॅन्सकडूनच प्राप्त झालेले आहे. 



दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा शेडकडे (खालील स्केच मध्ये दाखवल्याप्रमाणे) लाल आणि निळ्या रंगसंगतीतली पण WAM 4  प्रकारची एंजिने होती. गंमत म्हणजे लाल आणि निळा रंग उलट सुलट करूनही जी रंगसंगती येईल तशीही एंजिने विजयवाडा शेडकडे होती.





WAM 4 आणि त्यांच्या विविध रंगसंगती म्हणजे मज्जा मज्जा आहे नाही ?


South Central Railway's Vijaywada electric loco shed is one of the prominent loco sheds. Vijaywada ("Bezawada" as foreigners used to pronounce it. And hence the shed short form "BZA") is one of the important junctions on Chennai - Howrah and Chennai - Delhi route. It also has Diesel Shed.

BZA shed WAM 4 locos had distinct liveries. From Rust Red to Rust Red + Blue combination. Recently there was a trend in most of the loco sheds to paint its fleet of WAM 4s, WAG 5s and WAG 7s with Pink + Silver colour combination. This combination was popularly known as "Barbie Doll Livery" in railfans.

Now all WAM 4 s in BZA shed are decommissioned. There used to be Red + Blue livery as depicted in the sketch as well as exactly reverse to it (Red and Blue interchanged) by BZA shed.

BZA shed WAM 4 locos have hauled prestigious trains like Grand Trunk Express, Tamilnadu Express and Coromondel Express in past. We have seen BZA WAM 4 loco hauling Dakshin Express and Kazipet - Nagpur passenger here in Nagpur.

Drawing credit : Mrunmayi Ram Kinhikar

Tuesday, May 25, 2021

भुसावळ शेडची क्लासिक आणि नवीन रंगसंगती.

भारतातल्या मोठ्ठ्या एंजिन शेडसपैकी एक, भुसावळ शेड. एकेकाळी इतर सगळी शेडस रंगीबेरंगी एंजिने आणत असताना, भुसावळ शेड मात्र काळपट लाल रंगातली एकाच रंगसंगतीतली एंजिने आणताना पाहिली की बोअरींग वाटे. पण आता ही जुनी रंगसंगती "क्लासिक" म्हणून गणली जाते आणि त्याला मागणीही आहे. किती विचित्र असत ना माणसाचे मन ?

कुसुमाग्रजांनी लिहील्याप्रमाणे
व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे
अन उबेत त्या घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते.
अशी आपली सगळ्यांचीच अवस्था असते. एखाद्या गोष्टीची किंमत ती वस्तू दुर्मिळ झाल्याविना कळत नाही. ती वस्तू नाहीशी झाल्यावरच त्या वस्तूची ओढ जाणवते.



Bhusaval Shed in Central Railways used to home steam locomotives. In fact it used to be one of the biggest steam locomotives sheds in India.
After it was decided to decommission steam locomotives in India, Bhusaval shed homed electric locomotives.
It initially homed WAG 2 type of locomotives. Later it got WAM 4 locomotives in its fleet.
During our childhood, Bhusaval used to be a point of loco change for almost every trains coming in from Etarsi and Nagpur and going towards Mumbai. Mumbai - Bhusaval section was electrified in late 60 s. While Bhusaval - Nagpur - Durg section of Indian Railways was electrified in early 90 s.
Bhusaval shed WAM 4 used to have Rust Red livery with yellow band initially. This livery was matching with the coach livery at that time.
Later Bhusaval shed started painting its locomotives in Cream + Red livery.
Bhusaval shed also received a few locos transferred from Ajni shed in Central Railways.
Drawing credit to Mrunmayi Ram Kinhikar.


New liveried BSL shed's WAM 4.

Monday, May 24, 2021

भिलाई शेडचे Ice Cream रंगसंगतीतले WAM 4.

 भारतात पहिले WAM 4 प्रकारचे एंजिन 20400 नंबरचे दक्षिण पूर्व रेल्वेच्या भिलाई शेडलाच मिळाले होते. "रजत आभा" असे त्याचे नामकरणही चित्तरंजन एंजिन कारखान्याने केलेले होते.


March 1971 : First WAM 4 type of locomotive joined Indian Railway Service. It was named as " Rajat Abha" and was allotted to Bhilai shed in South East Railway. The road number of the locomotive was 20400.
These 3850 hp locomotives used to run with 120 kmph as maximum speed.
They hauled Rajdhanis, Shatabdis and many Super Express trains from 1971 till 2015.
With newer generation's faster, more powerful WAP 4, WAP 5, WAP 7 type of locomotives, these WAM 4 locomotives have to take a back seat and finally in January 2019, the last running WAM 4 was taken off track.
These WAM 4 were painted with various liveries by the various loco sheds they were allotted to.
One such livery is Bhilai shed's ICE CREAM livery.

Drawing credits: Mrunmayi Ram Kinhikar



Wednesday, May 19, 2021

भारतीय रेल्वेचे एक सेवक : WAM 4

 १९७० मध्ये उत्पादनांना सुरूवात झालेल्या आणि १९८३ पर्यंत चित्तरंजन, प. बंगाल येथे निर्माण होत राहिलेल्या भारतीय रेल्वेच्या एका निष्ठावान सेवकाने आपला सेवाकाळ संपवून नुकतीच सेवानिवृत्ती घेतली.


W = Wide Gauge i.e. Broad Gauge { M - Meter Gauge , Z - Narrow Gauge (2 feet 6 inches) and N - Narrow Gauge (2 feet)}


A = A.C. supply traction 15 kV alternating current supply { C - 1500 V DC supply traction. Was existing between Mumbai and Igatpuri and Mumbai and Pune till 2016, D - Diesel locomotive}


M = Fit for Mixed traffic hauling (i.e. Passenger traffic and goods traffic)  {G - Fit for Goods trains , P - Fit for passenger trains, S - Fit for shunting only}


भारतीय रेल्वेत एखाद्या रेल्वे एंजिनाचे सेवा आयुष्य ३० ते ३५ वर्षे असते. मार्च १९७१ मध्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या भिलाई शेडमध्ये सेवेत रूजू झालेल्या २०४०० या एंजिनचे नामकरण "रजत आभा" असे केले गेले होते. १३ वर्षांच्या काळात चित्तरंजन एंजिन कारखान्याने एकूण ५०० अशी WAM 4 जातीची एंजिने बांधलीत. ऑगस्ट १९८३ मध्ये शेवटले WAM 4 एंजिन २१३९९ या नंबरने आणि "अनंत" या नावाने मध्य रेल्वेच्या भुसावळ शेडमध्ये रुजू झाले.

१९७१ ते २०१५ पर्यंत या ३८५० हॉर्सपॉवरच्या आणि १२० किमी प्रतितास महत्तम वेगाने धावू शकणा-या या एंजिनांनी आपली सेवा राजधानी, शताब्दी आणि इतर प्रतिष्ठित गाड्यांसाठी दिली. यांची वेगवान धाकटी पिढी (WAP 4) आणि नव्या तंत्रज्ञानाची (3 phase) नवी पिढी आली (WAP 5, WAP 7) आणि यांचे महत्व कमी झाले. आणि जानेवारी २०१९ मध्ये शेवटल्या WAM 4 ला मुख्य मार्गातल्या सेवेतून सेवानिवृत्त केल्या गेले. 

मध्यम वेग आणि मध्यम शक्ती असली तरी या एंजिनांचे वैशिष्ट्य असे की ही एंजिने ज्या शेडमध्ये जायची त्या शेडचा साज अंगावर धारण करायची. भारतभर पसरलेल्या विविध शेडसमध्ये विविध रंगसंगती धारण करून ही एंजिने राहिलीत. आजकालच्या WAP 4 च्या एकसारख्या लालभडक किंवा WAP 7, WAP 5 च्या एकसारख्या पांढ-या रंगांपेक्षा विविध रंगसंगतीची WAM 4 एंजिने पाहणे हे नेत्रसुखद होते. तसेही १९७० आणि १९८० च्या दशकात भारतीय रेल्वे आपल्या गाड्यांनाही वेगवेगळी रंगसंगती देत असे. नंतर सगळ्याच गाड्यांना निळा + फ़िका निळा, नंतर एल एच बी कोचेसचा लाल + चंदेरी, किंवा आजकालच्या "उत्कृष्ट" कोचेसचा पिवळा + काळपट लाल अशी एकसारखी रंगसंगती आली. गाड्यांच्या रंगसंगतीची विविधता हरवली तरी WAM 4 एंजिनांनी ही विविधता जपून ठेवली होती. आता ते पण निवृत्त झालेत.

या निमित्ताने माझ्याकडे असलेल्या काही WAM 4 एंजिनांचे फ़ोटोज आणि माझ्याकडे नसलेल्या पण फ़ोटोंवरून "Autodesk Sketchbook" या ऍपमध्ये माझ्या मुलीने काढलेल्या काही शेडच्या रंगसंगती आपल्या सगळ्यांसाठी सादर.


अजनी शेडकडे WAM 4  एंजिने होती याची कल्पना ब-याच रेल्वेफ़ॅन्सना सुद्धा नाही. १९९५ ते १९९९ काळात २०४६९, २०५२९, २०६०० अशी काही एंजिने अजनी शेडकडे होती. विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, भुसावळ पॅसेंजर या गाड्यांना अजनी शेडची एंजिने लागत असत. अशाच एका प्रवासात विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करताना, नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफ़ॉर्म क्र, ३ वर अजनी शेडच्या एंजिनाचा मी काढलेला फ़ोटो. फ़ोटोत दिसतोय तो माझा धाकटा भाऊ, श्रीकांत प्रकाश किन्हीकर. 



मध्य रेल्वेच्या अजनी शेडच्या एंजिनांची रंगसंगती मध्य रेल्वेच्याच भुसावळ शेडच्या काळपट लाल रंगांपेक्षा दक्षिण पूर्व रेल्वेच्या भिलाई आणि टाटानगर शेडच्या लाल, निळा आणि पिवळा रंगात रंगून जाणारी छान होती. भुसावळ शेडनेही मग नंतर काळपट लाल रंगसंगती टाकून देऊन छान लालचुटूक व क्रीम पिवळा अशी सुंदर रंगसंगती ल्यायला सुरूवात केली होती. पण अजनी शेडचे पेस्टल कलर्स भुसावळ शेडला नाही जमलेत. १९९९ नंतर अजनी शेडची एंजिने भुसावळ शेडला दिल्या गेलीत आणि ती पण नवीन रंगात रंगून गेलीत.


भुसावळ शेडचा मूळ काळपट लाल रंग


भुसावळ शेडची नवीन लाल पिवळी रंगसंगती. हे एंजिन अजनी शेडमधून भुसावळकडे गेलेले आहे.




पहिले WAM 4 एंजिन प्राप्त झालेल्या दक्षिण पूर्व रेल्वेच्या भिलाई शेडने त्यांच्या एंजिनांना भरपूर रंगसंगतीने नटवले. त्यातली एक लाल + क्रीम + निळी रंगसंगती. 



भिलाई शेडचीच एक रंगसंगती निळी आणि क्रीम. याला सगळे रेल्वेफ़ॅन्स आईस क्रीम रंगसंगती असे म्हणायचेत. 


लाल आणि क्रीम रंगसंगती ही सुद्धा भिलाई शेडची जुन्या रंगसंगतींपैकी एक होती.


दक्षिण पूर्व रेल्वेच्याच टाटानगर शेडनेही भिलाई शेडसारखीच लाल + पिवळी रंगसंगती (मध्ये छोटासा निळा पट्टा) अवलंबली होती. टाटानगर शेडकडे तसेही WAM 4  प्रकारची एंजिने एकूण कमीच होती. 


उत्तर रेल्वेच्या गाझियाबाद, पूर्व रेल्वेच्या मुगलसराय आणि पश्चिम रेल्वेच्या वडोदरा शेडसच्या WAM 4 ना एकसारखी रंगसंगती होती. पण वडोदरा शेडच्या एंजिनांवर त्यांचे नंबर्स लिहीण्याची एकदम विशिष्ट अशी पद्धती होती. (Seven Segment Display)


गाझियाबाद किंवा मुगलसराय शेडचे WAM 4.


पूर्व रेल्वेच्या हावडा शेडकडे एकदम मूळ रंगसंगतीतली, भुसावळ शेडसारखी काळपट लाल रंगाची, WAM 4 एंजिने होती.  पण मधला पिवळा पट्टा मात्र थोड्या वेगळ्या प्रकारचा होता.


दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा शेडकडे पण अशी काळपट लाल रंगातली WAM 4 एंजिने होती. पण त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती म्हणजे काळपट लाल + निळी रंगसंगती. या स्केचमध्ये दाखविलेले लाल आणि निळे रंग उलटसुलट जागी करूनही जी रंगसंगती येईल त्या रंगसंगतीतही या शेडची एंजिने यायचीत. रेल्वेफ़ॅन्ससाठी मज्जा.


विजयवाडा शेडने त्यांचे काही WAM 4 आणि WAG 5 एंजिनेही गुलाबी आणि चंदेरी रंगांमध्ये रंगविलेली होती. याला रेल्वे फ़ॅन्समध्ये "बार्बी डॉल" रंगसंगती म्हणून ओळखले जायचे. 


पूर्व तटीय रेल्वेच्या विशाखापट्टणम शेडची रंगसंगती नारंगी + पिवळी रंगसंगती. आणखी एक वेगळाच प्रयोग.


मध्य रेल्वेच्या इटारसी शेडचीही लाल + पिवळी रंगसंगती. इटारसी शेडचे नाव हस-या अक्षरात लिहीण्याची यांची लकब एकमेवाव्दितीय होती.


दक्षिण रेल्वेच्या अरक्कोणम शेडचीही पण अशीच लाल + पिवळी रंगसंगती होती. पण सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती म्हणजे सप्तगिरी रंगसंगती. चेन्नईवरून तिरूपतीला जाणारी सप्तगिरी एक्सप्रेस ही दक्षिण रेल्वेची अत्यंत लाडकी गाडी. या गाडीला हिरवा + पिवळा अशी वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती होती. अरक्कोणम शेडने या गाडीसाठी लागणा-या काही काही WAM 4 एंजिनांनाही हाच हिरवा + पिवळा रंग दिलेला होता. एंजिन आणि गाडी एकाच रंगाची असण्याचा हा योग मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीनच्याही नशिबात एकेकाळी असायचा.

आज ही सगळी एंजिने सेवानिवृत्त झालेली आहेत. काही काही एंजिनांना काही स्टेशन्सबाहेर विशेष रूपाने जतन करण्यातही येईल. काही काही एंजिने रेल्वेच्या संग्रहालयातही जतन करण्यात येतील. गेली ३ दशके प्रवाशांची इमानेइतबारे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या या रेल्वे कर्मचा-यांना या आठवणीव्दारे मानाचा मुजरा.

- रेल्वेफ़ॅन, राम