Tuesday, August 11, 2026

राक्षस, मनुष्य आणि देव

आज सकाळीच कॉलेजला येताना एका कारमागे कुठल्यातरी सदगुरूंचे 

"तुम्ही जगा, दुसर्‍यांना जगवा"

हे बोधवाक्य वाचले,  आणि विचारचक्र सुरू झाले.

"तुम्ही जगा आणि दुसर्‍यांना जगवा." ही संतांची भूमिका झाली.

"तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या." ही सर्वसामान्य मनुष्यमात्रांची भूमिका झाली.

आपण बघतो की समाजात काही काही व्यक्ती स्वतःही सुखाने जगत नाहीत आणि दुसर्‍यांनाही सुखाने जगू देत नाहीत. अशा व्यक्ती राक्षस असतात.

The Family Man या सिरीजमधले एक वाक्य आठवले. "आदमी जब जानवर बन जाता है तो वह जानवर से बदतर बन जाता है. वो शैतान बन जाता है." 

अगदी खरंय नं. ?

- जगाच्या राक्षसपणाचा, उगाचच केल्या गेलेल्या हेव्यांचा, सदगुणांना दुर्गुण आणि (आपल्या लाडक्यांच्या) दुर्गुणांनाही सदगुण ठरविण्याच्या धडपडीचा एक मूक साक्षीदार

आणि 

या सगळ्या दुनियादारीचा आपल्या (आणि आपल्या कुटुंबियांच्या) व्यक्तिमत्वावर व वागणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून सतत जपत राहणारा सामान्य मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

No comments:

Post a Comment