माझे एक प्रमेय आहे.
Sunday, July 25, 2021
Theorem of relationship inside a family.
Saturday, July 24, 2021
मनुष्यमनोव्यापार
कधीतरी एखाद्या सुटीच्या दिवशी दुपारी आपल्याला "घोडे बेचके सोना" या म्हणीला साजेल अशी झोप लागते. भरपूर वेळ झोपल्यानंतर आपण जागे होतो...
Friday, July 23, 2021
रिता मंडप
हळदीच्या दिवशी मैत्रिणी, नातेवाईकांच्या थट्टेत बुडून, लाजून गेलेली नवरी लग्नाच्या दिवशी (मंगल कार्यालय किंवा लाॅनमध्ये उभारलेल्या) लग्नमंडपात जाते.
Thursday, July 22, 2021
परिवर्तन मार्क २
यापूर्वीच्या परिवर्तन मार्क१ बाबत इथे वाचा.
हा मी काढलेला आणि (नावासकट
व नावाशिवायही) खूप कॉपी झालेला फ़ोटो.
ह्या मॉडेलमध्ये बसेसचा लुक महामंडळाने बदलला होता. आजवर एस. टी. बसेसचे समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून चेसिससोबत जसे आले, तसेच वापरत होते. यावेळी पहिल्यांदा समोरचे काऊल टाटा किंवा लेलॅण्ड कंपनीकडून आलेले जसेच्या तसे न लावता, फ़ायबर रिएन्फ़ोर्स्ड प्लास्टिकचे (FRP) पॅनेल बनवून महामंडळाने वापरले होते.
गाड्यांना जुन्या गाड्यांप्रमाणे लाल + पिवळा किंवा परिवर्तन मार्क १ चा निळा + हिरवा रंग न देता संपूर्ण लाल रंगात रंगविण्यात आले होते. बाजूने जुन्या एशियाड (निम आराम) बसेसना असायचे तसे पण पांढ-या रंगांचे दोन छोटे पट्टे मारण्यात आलेले होते. निम आराम गाड्यांना असा एकच पट्टा फ़िकट निळ्या रंगातला असे.
परिवर्तन मार्क १ मध्ये प्रवासी सामान ठेवण्याच्या रॅकमध्ये बदल झालेले होते. रॅक्ची जाळी जाऊन तिथे आता अखंड पत्रा आलेला होता. ते बदल या ही मॉडेलमध्ये कायम ठेवण्यात आले.
फ़क्त परिवर्तन मार्क १ मध्ये
बसच्या शेवटी छताला जो गोलाकार असायचा, तो बदलून पुन्हा जुन्या बसेससारखा सपाट भाग
त्या ठिकाणी आलेला होता.
काही दिवसांनी ह्या FRP पॅनेल्सचा तकलादूपणा एस. टी. च्या लक्षात आला असावा. मग त्या पॅनेल्सना काही दुरूस्तीची गरज पडली तर एस. टी. पुन्हा टाटा किंवा लेलॅण्डची स्टॅण्डर्ड काऊल त्याठिकाणी लावून देत असे. आणि परिवर्तन मार्क ३ नंतर असे काऊल बदलण्याचा प्रयोग एस. टी. ने पुन्हा केला नाही. अगदी अगदी आता आता माइल्ड स्टीलच्या बसेसपर्यंत.
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीत
या बसेस MH - 12 / CH 75XX आणि MH - 12 / CH 76XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.
मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबादमध्ये या बसेस MH - 20 / D 84XX आणि MH - 20 / D 85XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.
मध्यवर्ती कार्यशाळा हिंगण्यात या बसेस MH - 40 / 84XX सिरीजमध्ये बांधल्या गेल्यात.
- या बसनामक प्रेयसीच्या प्रेमात असल्याने तिच्या
कुठल्याही रूपावर प्रेम आणि प्रेमच करणारा, बसफ़ॅन राम किन्हीकर.
अवघाची संसार सुखाचा करेन
"नातेसंबंध हे काचेच्या भांड्यांसारखे असतात. तडा गेल्यावर तो तडा सांधता येतो पण ती खूण कायम असते." असे theoratically वाचून त्यावर विश्वास ठेवून एकेक विविक्षित प्रसंगात आपली तशी प्रतिक्रिया देण्यापासून
Wednesday, July 21, 2021
मनकवडा घन घुमतो, दूर डोंगरात.
Tuesday, July 20, 2021
परिवर्तन मार्क १
२००३ च्या सुमारास आपल्या एस. टी. ने त्यांच्या साध्या गाड्यांच्या ताफ़्यात मोठ्ठा बदल करण्याचे ठरविले. आणि त्याप्रमाणे पहिली प्रोटोटाईप बस दापोडी कार्यशाळेत बांधल्या गेली. बसेसमधल्या संरचनेच्या परिवर्तनाचा हा पहिली मोठा प्रयत्न होता. तत्पूर्वी २००० मध्ये बसेसचे मागचे दार पुढे आणून बसच्या वरखाली होणा-या (dropping down) खिडक्यांऐवजी पुढेमागे होणा-या (sliding) खिडक्या आणल्या होत्या. पण जवळपास ४० - ४५ वर्षे तशाच असणा-या बसच्या संरचनेतले पहिले परिवर्तन या बसेसने आणले होते. म्हणून त्या बसेसपासून साध्या बसेसना (निम आराम नसलेल्या) परिवर्तन म्हणण्याची सुरूवात झाली.
एस. टी. महामंडळाच्या तिन्ही कार्यशाळांनी अशा प्रकारच्या बसेसची बांधणी सुरू केली.
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीने MH - 12 / AU 90XX व AU 91XX सिरीजमध्ये
मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबादने MH - 20 / D 64XX व D 65XX सिरीजमध्ये
मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने MH - 31 / AP 95XX व AP 96XX सिरीजमध्ये










