आज आमच्या VNIT मधल्या प्रशिक्षणानंतर मी सध्या VNIT मध्येच काम करणार्या एका सहकर्मीकडे गेलो होतो. त्यांची सुंदर, कलात्मकरित्या सजवलेली केबिन मी बघतच राहिलो. त्यातलेच हे एक "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" माझ्या दृष्टीस पडले.
बिन महत्वाच्या पण तातडी असलेल्या कामांना दुसर्यांकडे सोपविणे आणि बिन महत्वाचे आणि बिन तातडीचे काम सरळ टाळायचे असे हा आयसेनहाॅवर सुचवतो. कागदावर दिसायला हे मॅट्रिक्स अगदी आदर्श वाटते.
पण आमचा मुळातला स्वभावच इतका पापभिरू, भित्रा आणि धांदरट आहे की पुढ्यातली सगळीच कामे आम्हाला महत्वाची आणि तातडीची वाटतात. आता काय करायचे ? आमच्याकडून कुठल्याही कामाचे "बिन तातडीचे" किंवा "बिन महत्वाचे" असे वर्गीकरण होतच नाही. आपल्याला करावी लागणारी सगळी कामे महत्वाची आणि तातडीची असतात यावर आमचा अत्यंत दृढ म्हणावा तसा विश्वास आहे.
मग हे "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" कसे आचरणात आणायचे ? हाच सध्या आमच्यापुढला 'क्रायसिस' आहे.
- पुस्तके वाचायला आवडणारा पण त्याहूनही प्रॅक्टीकल जगायला आवडणारा एक साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
रामभाऊ अगदी बरोबर आहे. हे matrix आचरणात आणण्यासाठी बेदरकार व्यक्ती ची गरज आहे. अती तातडीची कामे समजतात पण त्या नंतर अग्रक्रम ठरवणे अवघड आहे. बरं दुसरा दुसरी हे काम नीट करेल का याचा घोर लागतोच. इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या त्रुटी सांगा विचारले की सगळे मला delegate करता येत नाही हे सेफ उत्तर देतात
ReplyDeleteअगदी बरोबर. आपली कामे अधिक चांगल्या रितीने व्हावीत आणि अधिक जबाबदारीने व्हावीत असे वाटणा-या प्रत्येकाला हा डेलिगेशनचा प्रॉब्लेम सतावतोच.
Delete