यंदाच्या दिवाळीत सुंदर फुलांच्या सहवासात काढलेले माझे प्रकाशचित्र.
आणि
एका कृत्रिम बुध्दिमत्ता साधनाला सांगितल्यानंतर त्याने त्याच प्रकाशचित्राचे केलेले चित्रण.
या चित्रणात मला त्याने एकाचवेळी शैव आणि वैष्णव बनवलेले आहे.
रामास्वामी अय्यर
आणि
राममूर्ती अय्यंगार.
तसा मी शैव आणि वैष्णव दोन्हीही आहे. नावच राम आहे त्यामुळे शंकरजींचा भक्त अगदी स्वाभाविकपणे आहे.
माता च पार्वती देवी
पिता देवो महेश्वरा...
हे अगदी मनापासून मानणारा आहे. प्रभू रामचंद्र हे सुध्दा महादेव शंकराचे निःसीम भक्त होते.
पण बालपणापासून आजोळी आणि इतर नातेवाईकांकडे असलेले कट्टर वैष्णव वातावरण आणि सदगुरू उपदेशाने गेली अनेक वर्षे करीत असलेले श्रीमदभागवताचे, श्रीमद्भगवतगीतेचे आणि श्रीविष्णुसहस्रनामाचे वाचन, पठण, अभ्यास व परिशीलन यामुळे खूप आतून मी पक्का वैष्णव आहे.
अरे बापरे ! आता या कृत्रिम बुध्दिमत्ता साधनांनी केवळ बाह्य माणूस, त्याच्या भौतिक आवडीनिवडी आणि त्याच्या बाह्यांगालाच नव्हे तर खोल आतवर असलेल्या अंतरंगातही डोकावून पहायला सुरूवात केली की काय ?
- महादेव शंकर आणि महादेवी पार्वतीवर निःसीम भक्ती असणारा एक विष्णुनामधारी सच्चा वैष्णव, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:
Post a Comment