प्रसंगः सुटीच्या दिवशी घरी वामकुक्षीचा.
फोनः सर, हम तमकेढमके इस्टेट एजन्सीसे बात कर रहे है. नागपूर, मुंबई, पुणे की कुछ बहोतही प्राइम प्राॅपर्टीज हमारे पास अवेलेबल है. आपको कोई इंटरेस्ट ?
तो हे एव्हढ्या जलद म्हणतो की "Mutual fund investments are subjected to market risks...." म्हणणार्या माणसाने याच्याकडे ट्यूशन लावावी.
मी न कळल्याने त्याला पुन्हा एकदा त्याचे नाव, एजन्सीचे नाव वगैरे सावकाश वदवून घेतो आणि,
मीः हां जी. मै तो सर्च ही कर रहा हू कोई अच्छी प्राॅपर्टी की.
इस्टेट एजंट (उत्साहाने): तो सर किस लोकेशन पे आप प्राॅपर्टी खरीदना चाहोगे ?
त्या इस्टेट एजंट कडे नरसाळा, शंकरपूर, वडधामना याच्या पलीकडे एकही प्राॅपर्टी नसल्याची खात्री असल्याने,
आणि हे कोकरू भंडार्याच्या पूर्वेला व कोंढाळीच्या पश्चिमेला कधीही गेलेले नाही याची खात्री असल्याने,
मीः मै जरा मलाबार हिल्स, पेडर रोड या नेपियन सी रोड पे कुछ प्लाॅटस लेना चाह रहा था.
आतातरी पुढला माणूस आपली भंकस करतोय हे समजाव की नाही ? पण
इस्टेट एजंटः सर, ये कहा पे आता हे ?
मीः (आवाजात शक्य तितकी निरागसता आणत) मुंबई मे. आपने बोला न, की मुंबई की भी कुछ प्राॅपर्टीयाँ है, इसलिये. आप मॅप मे देखिये. आरामसे बताइये.
फोन ठेवल्यावर त्याने आपल्या बाॅसला हा प्रश्न विचारून चांगला धडा घेतला असणार कारण पुन्हा त्याचा फोन आला नाही.
अरे, वामकुक्षीच्या वेळी फोन सायलेंट करायला विसरलो तर याची किंमत नेहमी आम्हीच का मोजायची ?
- हाॅ, हाॅ करून विकट हसणारा पाताळविजयम चा मद्रासी राक्षस के. रामैय्या.
No comments:
Post a Comment