श्रीमदभागवत दशमस्कंध.
श्रीकृष्ण रूक्मिणी संवाद.
भगवान
श्रीकृष्णः रूक्मिणी, खरच मी विचार केला की तुला माझ्याहून चांगला वर
नक्कीच प्राप्त झाला असता. मी सर्वार्थाने तुझ्या योग्य पुरूष नाही.
भगवंताचे हे कठोर वाक्य ऐकून रूक्मिणी बिचारी शोकाकूल झाली. आता भगवंताचा आपल्याला विरह होणार या भीतीने तिला रडूच कोसळले.
तेव्हा
भगवंतांनी आपली चेष्टा आवरती घेऊन तिची समजूत घातली, मनधरणी केली. (पहा,
लक्षात ठेवा. प्रत्यक्ष भगवंताला हे चुकले नाही, तिथे तुमच्या
माझ्यासारख्या यःकश्चित मनुष्यमात्रांचा काय पाड ?)
त्यानंतर त्रैलोक्यस्वामी भगवान श्रीकृष्ण जे म्हणाले ते फार फार महत्वाचे आहे. अगदी काळजावर कोरून ठेवण्यासारखे.
भगवान
श्रीकृष्णः प्रिये रूक्मिणी, या संसारात खरोखर काही सुखाची, आनंदाची गोष्ट
असेल तर ती म्हणजे पत्नीची थट्टा मस्करी करणे, तिच्याशी प्रेमसंवाद करून
तिचा रूसवा घालवणे.
बाकी हे संपूर्ण जग दुःखानेच भरलेले आहे.
श्रीमदभागवताचे अध्ययन करताना जेव्हा
जेव्हा हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा माझ्यासरख्या खट्याळ साधकाचे याबाबतीत
नियोजन सुरू होते आणि माझ्यातला व्यवस्थापक, योजक ते योग्य वेळी
पूर्णत्वास नेतोही.
— आपला भरपूर खट्याळ आणि थोडा नाठाळ साधक रामभाऊ.
No comments:
Post a Comment