Saturday, August 6, 2022

देवाचिये द्वारी - २८

 


अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस I

रचिले विश्वासे ज्ञानदेवे II


नित्य पाठ करी इंद्रायणीतीरी I

होय अधिकारी सर्वथा तो II


असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन I

उल्हासेकरून स्मरण जीवी II


अंतकाळी तैसा संकटाचे वेळी I

हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य II


संतसज्जनांनी घेतली प्रचीती I

आळशी मंदमती केवी तरे II


श्रीगुरूनिवृत्ती वचन प्रेमळ I

तोषला तात्काळ ज्ञानदेव. IIअशा हा साध्या सोप्या हरीपाठाचे स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आणि उल्हासाने जो मनुष्यमात्र पठण, चिंतन करेल त्याच्या सर्व संकटांमध्ये आणि अंतकाळी प्रत्यक्ष हरी त्यांना सांभाळील हे वचन आपल्या गुरूंच्या, श्री निवृत्तीनाथा महाराजांच्या सामर्थ्यबळावर माऊली आपल्याला या अभंगातून देत आहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध नवमी, शके १९४४ , दिनांक ०६/०८/२०२२)

No comments:

Post a Comment