Thursday, August 11, 2022

देवाचिये द्वारी - ३३

 


अनीतीने द्रव्य जोडी I धर्म नीती न्याय सोडी I

संगतीचे मनुष्य तोडी I तो येक मूर्ख II


दोघे बोलत असता I तिसरा जाऊन बैसे तेथे I

डोई खाजवी दोन्ही हाते I तो येक मूर्ख II


लक्ष्मी आलियावरी I जो मागील वोळखी न धरी I

देवी ब्राह्मणी सत्ता करी I तो येक मूर्ख II


श्रीमद दासबोधाच्या दुस-या दशकाच्या पहिल्याच मूर्खलक्षणनाम समासात श्री समर्थ मूर्खांच्या लक्षणांचा उहापोह करताहेत. धर्म, निती, न्याय यांचा विचार न करता आपल्यासोबतच्या मनुष्यांना तोडून धन जोडणारा, कुणीही दोघे चर्चा करीत असताना त्यांच्या मध्ये जाऊन चर्चेत (निमंत्रणाशिवायच) सहभागी होणारा, दोन्ही हातांनी करकरा डोके खाजविणारा आणि पैसा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मदात आपल्या आप्तसंबंधियांना विसरणारा, मदात देव आणि ब्राह्मण यांच्यावर सत्ता गाजविणारा मूर्ख असतो.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध चतुर्दशी / पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा शके १९४४ , दिनांक ११/०८/२०२२)

No comments:

Post a Comment