Monday, August 15, 2022

देवाचिये द्वारी - ३७

 


उपरती नाही त्याग नाही I समता नाही लक्षण नाही I

आदर नाही प्रीती नाही I परमेश्वराची II

 

परगुणांचा संतोष नाही I परोपकारे सुख नाही I

हरिभक्तीचा लेश नाही I अंतर्यामी II

 

ऐसे प्रकारीचे पाहता जन I ते जीवचि प्रेतासमान I

त्यांसि न करावे भाषण I पवित्र जनी II

 

ज्या मनुष्यमात्राला परमेश्वराबद्दल प्रेम नाही, आदर नाही, ज्याला दुस-यांचे चांगले गुण पाहून आनंद होत नाही, दुस-यांवर उपकार करावेसे वाटत नाहीत, असे मनुष्यमात्र जिवंत असूनही प्रेतासमान समजावेत आणि त्यांच्याशी वादविवाद करू नये असे श्रीसमर्थांना मनापासून वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण चतुर्थी शके १९४४ , दिनांक १५/०८/२०२२, भारतीय स्वातंत्र्यदिन)


No comments:

Post a Comment