Sunday, June 21, 2026

ब्लॉगच्या वाचकसंख्येचा आणि अगदी अनपेक्षित ठिकाणांहून मिळालेल्या वाचकांचा आनंदोत्सव.

गेल्या काही दिवसात वाचकांच्या प्रेमामुळे आणि परमेश्वरी कृपेमुळे ब्लॉगच्या वाचकसंख्येत भरघोस वाढ झालेली आहे हे लक्षात आले. आज सहज त्या वाचकसंख्येच्या विश्लेषणात जरा खोलवर गेलो आणि अचंबा वाटला.



भारतात, सिंगापूरमध्ये, जपानमध्ये, नेदरलॅंडस मध्ये, अमेरिकेमध्ये नातेवाईक, मित्र, परिचित आहेत म्हणून तिथून माझ्या ब्लॉगला वाचक मिळतात हे मी समजू शकतो. पण भारतापेक्षा किंवा उपरोल्लिखित ठिकाणांपेक्षाही फ़ार जास्त वाचनसंख्या ही ब्राझिल आणि व्हिएतनाममधून आहे हे बघून मला आश्चर्य वाटले. हे देश, जगाचा हा भाग माझे लिखाण वाचत असेल अशी मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.


अर्थात या ठिकाणी जाऊन तिथे स्वतःला सुस्थापित करून माझा ब्लॉग वाचणा-या मराठी वाचक जनांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. असाच लोभ असू द्यात मंडळी.


- आवड, छंद आणि अभिव्यक्त व्हायचं म्हणून ब्लॉग सुरू केलेला आणि अत्यंत निष्काम वृत्तीने लेखन करीत गेलेला एक सर्वसामान्य साहित्य, संगीत कलाप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

2 comments:

  1. रामभाऊ, मी इंग्लंड मधुन आपले लिखाण एंजॅाय करतो. बरेच वर्षा पूर्वी योगायेगाने आपले रेल्वे वरचे लिखाण वाचले. नंतर आपले एस.टी . वरचे लेख , शिक्षक म्हणुन अनुभव व इतर अनेक विषय आवडले.
    कदाचित असेच मध्यम वर्गीय बालपण भाझे असल्याने तुमच्या लिखाणातील आशय लगेच समजतो.
    फरक फक्त भौगोलीक आहे पण घरादारातील शिस्त व मुल्ये तशीच आहेत.
    असेच उत्तम लिखाण होत राहो या सदीच्छा🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार, सर. आपल्यासारख्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळे लिहीण्याची जिद्द वाढते.

      पुनश्च एकवार आभार.

      Delete