इ. स. २००३ मध्ये जवळपास चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदा बसेसच्या डिझाईनमध्ये मोठा बदल घडवल्यानंतर, दोनच वर्षात एस. टी. ने आपले डिझाईन पुन्हा थोडे बदलले. त्याबद्दलचे लेख परिवर्तन मार्क १ आणि परिवर्तन मार्क २ इथे आणि इथे.
परिवर्तन मार्क २ नंतर अवघ्या ८-९ महिन्यांमध्ये आपल्या एस. टी. ने पुन्हा आपले डिझाईन बदलले आणि परिवर्तन मार्क ३ बसेस आल्यात. या बसेसमध्ये एस. टी. ने पुन्हा आपला परंपरागत लाल + पिवळा रंग आणला होता आणि टाटा आणि लेलॅण्ड कंपनीचे मूळ काऊल्स जसेच्या तसे बसेसना द्यायला सुरूवात केली.
परिवर्तन मार्क १ बसेसच्या खिडक्यांच्या काचांना फ़्रेम्स नव्हत्या. अशा फ़्रेम्स नसलेल्या काचांची व्ह्यायब्रेशन्स खूप होत असणार आणि त्यांचा आवाजही भरपूर होत असणार हे एस. टी. च्या लक्षात आले असावे आणि त्यांनी काचांना फ़्रेम्स द्यायला सुरूवात केली. परिवर्तन मार्क ३ बसेसच्या खिडक्यांना ॲल्युमिनियम फ़्रेम्स होत्या पण परिवर्तन मार्क २ बसेसच्या खिडक्यांच्या फ़्रेम्सप्रमाणे त्या काळ्या रंगात रंगवलेल्या नव्हत्या. परिवर्तन मार्क ३ बसेसच्या खिडक्यांच्या काचांच्या ॲल्युमिनियम फ़्रेम्स छान दिसायच्यात. आणि दणकटही वाटायच्यात.
परिवर्तन मार्क ३ बसेसचा हा प्रयोग साधारण वर्षभर चालला. मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेल्या MH - 40 / 85XX या सिरीज पासून MH - 40 / 88XX या सिरीजपर्यंत हा प्रयोग चालला.
नंतर मात्र 2 बाय 2 आसन व्यवस्थेच्या, संपूर्ण लाल रंगातल्या परिवर्तन मार्क ४ बसेस आल्यात. परिवर्तन मार्क ४ बसेसचे हे डिझाईन मात्र पुढले १५ वर्षे चालले आणि एम. एस. बॉडीतल्या बसेस येईपर्यंत हे डिझाईन तसेच कायम राहिले.
- बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
Good Narrative!
ReplyDeleteThank you, Sir.
ReplyDelete