Monday, August 3, 2026

टाटाच्या राज्यात पाहुणी लेलँड

चंद्रपूरला आलो आणि इथल्या बसस्टॅण्डवर गेलो नाही असे क्वचितच घडले असेल.


असेच २०१२ च्या उन्हाळ्यात आजोळी श्रीनृसिंहजयंती उत्सव साजरा करण्यासाठी जमलो होतो. दुपारी जेवणे वगैरे निवांत आटोपून संध्याकाळी चंद्रपूर बसस्थानकावर आपल्या प्रेयसांना भेटायला गेलो होतो. तेव्हा लक्ष वेधून घेतलेली ही एक वेगळीच आणि सुंदर बस.


आपल्या एस. टी. बसेससाठी विदर्भ प्रदेश हा पारंपारिक रित्या टाटाचा प्रदेश आहे. २०१० - २०१२ या काळात विदर्भातल्या खूपसार्‍या डेपोंना MH 40 / N96XX आणि MH 40 / N 97XX या सिरिजमधल्या नागफूर कार्यशाळेने बांधणी केलेल्या लेलँड बसेस मिळाल्यात.


अगदीच काही काही डेपोंना दापोडी (पुणे) आणि चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) इथे बांधणी केलेल्या लेलँड बसेसही मिळाल्यात. त्यातलीच ही एक बस.


MH 14 / BT 2389


ASHOK LEYLAND CHEETAH model


२ बाय २ परिवर्तन बस


एकूण आसने ४४ + १ वाहक


अम. अमरावती १ आगार


मला वाटत २०१२ च्या उन्हाळी सुट्यांमध्ये विशेष फेरी म्हणून ही बस अमरावती आगाराने पाठविलेली होती.


स्थळः चंद्रपूर बस स्थानक


दिनांक: १/५/२०१२


यावेळी ही बस साधारण वर्षभर तरी जुनी असेल पण तिचा मेण्टेनन्स अगदी टॉप क्लास होता.

No comments:

Post a Comment