Showing posts with label अध्यात्मिक अनुभूती. Show all posts
Showing posts with label अध्यात्मिक अनुभूती. Show all posts

Friday, January 24, 2025

प्राणी, पक्षीसृष्टी आणि अध्यात्मिक अनुभूती

ती प्रभातीची होती वेळा ।

प्राची प्रांत ताम्र झाला ।

पक्षी किलकिलाटाला ।

करू लागले वृक्षावर ।।
श्रीगजाननविजय ग्रंथात केलेले हे वर्णन अनुभवण्याचा प्रसंग आला तो खुद्द श्रीगजानन महाराजांच्या शेगावातच, त्यांच्याच कृपाछत्राखाली उभ्या झालेल्या संस्थानाच्या भक्तनिवासाच्या आवारात.




आजकाल ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मोबाईल टाॅवर्स रेडिएशनचे प्रदूषण अशा अनंत कारणांमुळे पक्षी मानवी सहवासापासून दूर जायला बघतात. पण इथे जवळपास दहा हजार लोकांचा नित्य राबता असूनही असे असंख्य पक्षी निर्भयपणे वावरताना, विहरताना आणि किलकलाट करताना दिसतात. या जागेतली अध्यात्मिक स्पंदने त्या मुक्या जीवांना जाणवलीत, भावलीत आणि म्हणूनच ते इथे रमलेत.
- अध्यात्मिक स्पंदने मानवांपेक्षाही अधिक तरलपणे जाणू शकणार्या प्राणी, पक्षी सृष्टीत रमणारा एक क्षुद्र मानवप्राणी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.